Nashik Fig Farming : नासिक म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यापुढे उभे राहते ते द्राक्षे आणि डाळिंबाचे चित्र. नासिक जिल्हा हा डाळिंब आणि द्राक्ष उत्पादनासाठी तसेच कांदा या नगदी पिकाच्या शेतीसाठी विशेष ओळखला जातो. याव्यतिरिक्त जिल्ह्यात गहू, हरभरा, मका इत्यादी पारंपारिक पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात शेती होते.
मात्र आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. सिन्नर तालुक्यात देखील एका प्रयोगशील शेतकऱ्याने एक नवीन प्रयोग करत अंजीरच्या एक एकर शेतीतून तीन लाखांची कमाई केली आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची परिसरात चर्चा आहे.
कोण आहे हा अवलिया शेतकरी
सिन्नर तालुक्यातील शहा या गावातील चांगदेव विठ्ठल जाधव या प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपारिक पिकांच्या शेतीतून फारसे उत्पन्न मिळतं नसल्याने आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बगल देत फळबागा लावल्या आहेत. यामध्ये द्राक्षाच्या आणि डाळिंबाच्या बागा सर्वाधिक आहेत.
मात्र द्राक्ष आणि डाळिंब शेती पुढे देखील वेगवेगळी आव्हाने येत आहेत. डाळिंब बागांमध्ये तेल्या या रोगामुळे जिल्ह्यातील शेतकरी हातबल झाले आहेत. अशा परिस्थितीत चांगदेव यांनी अंजीर पिकाची शेती सुरु केली आहे. त्यांनी 2008 पासून अंजीर शेती सुरू केली असून सुरुवातीपासूनच या पिकाच्या लागवडीतून त्यांना चांगली कमाई होत आहे.
हे पण वाचा :- सिबिल स्कोर झिरो असतांनाहि मिळणार कर्ज ! काय असतात यासाठी अटी? पहा….
कोणत्या जातीच्या अंजीरची केली लागवड?
2008 मध्ये चांगदेव जाधव यांनी आपल्या 45 गुंठे शेत जमिनीत अंजीरची लागवड केली. दिनकर जातीच्या अंजीरची त्यांनी शेती सुरू केली असून पंधरा बाय पंधरा फूट अंतरावर या रोपांची लागवड त्यांनी केली आहे. 45 गुंठ्यात जवळपास 194 अंजीरची झाडे लावण्यात आली आहेत. रोप लागवड केल्यानंतर साधारणतः दोन वर्षांनी यापासून त्यांना उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षानंतर अंजीरच्या प्रत्येक झाडापासून त्यांना 30 किलो पर्यंतचे उत्पादन मिळत आहे.
विशेष म्हणजे त्यांनी उत्पादित केलेल्या अंजीरला 75 ते 85 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. जाधव यांनी सांगितले की, गेल्या वर्षी त्यांना पाच ते साडेपाच टन उत्पादन मिळाले. यासाठी त्यांना 70 ते 75 हजाराचा खर्च आला होता, आणि खर्च वजा जाता जवळपास तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. निश्चितच जाधव यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे. अलीकडे शेती व्यवसायात वेगवेगळी आव्हाने समोर असतानाच त्यांनी केलेला हा प्रयोग इतर प्रयोगशाल शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बाबत झाला मोठा निर्णय ! आता महामार्गांवर ‘या’ वाहनांना असेल बंदी, कारण काय? पहा…..