NCERT Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एनसीईआरटी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद येथे रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या रिक्त पदांसाठी बारावी पास ते पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. यासाठीची अधिसूचना देखील नुकतीच जारी करण्यात आली असून आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार नॉन टीचिंग स्टाफ या पदासाठी ही भरती राहणार आहे.
किती जागांसाठी होणार भरती?
नॉन टीचिंग स्टाफच्या तब्बल 347 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
नॉन टीचिंग स्टाफ पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास ते पदवीधर असावा. अर्थातच वेगवेगळ्या नॉन टीचिंग स्टाफ पदासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक अहर्ता राहणार आहेत. म्हणून एकदा इच्छुक उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचणे जरुरीचे आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. https://ncertrec.samarth.edu.in/ या लिंक वर जाऊन उमेदवारांना आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक?
विविध नॉन टीचिंग स्टाफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 19 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.
कोण-कोणती कागदपत्रे लागणार
या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांना काही कागदपत्रे देखील तयार ठेवावी लागणार आहेत. यामध्ये इच्छुक उमेदवारांना आपला बायोडेटा, दहावीचे प्रमाणपत्र, बारावीचे प्रमाणपत्र आणि पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्र लागणार आहे.
यासोबतच शाळा सोडल्याचा दाखला, उमेदवार जर मागासवर्गीय प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला, यासोबतच आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज आकाराचे फोटो लागणार आहेत.