अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- बॉलिवूड अभिनेता सोनू सूद नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो.
चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद अनेकांसाठी एक स्पेशल सुपरहिरो आहे. सध्या सोनू सूदने केलेल्या ट्विटची खूप चर्चा सुरु आहे.
नेटकऱ्यांनी सोनू सूदच्या ट्विटवरून त्याला ट्रोल केलं आहे. सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. तो सध्या पंजाबमध्ये आहे.
पंजाबच्या मातीविषयी बोलत त्याने फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा टीशर्ट परिधान केला आहे आणि पांढऱ्या रंगाचे बूट घातले आहेत.
फोटो शेअर करत ‘मेरे पंजाब दी मिट्टी दी खुशबू’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले होते. पण या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे सोनू सूदला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
एका यूजरने सोनू सूदची खिल्ली उडवत ही माती नाही सर शेण आहे असे म्हटले होते. दुसऱ्या एका यूजरने, ‘सर, तुम्ही ज्याला माती समजत आहात खरं तर ते शेण आहे’ असे म्हटले आहे. अनेकांनी सोनू सूदच्या या फोटोवर कमेंट करत त्याची खिल्ली उडवली आहे.