New Rule From May 2024 : येत्या सात दिवसात एप्रिल महिन्याची सांगता होणार आहे आणि मे महिन्याला सुरुवात होणार आहे. पण येत्या नवीन महिन्यात काही नियम देखील बदलणार आहेत. देशातील काही बँकेचे महत्वाचे नियम बदलणार आहेत. याचा सरळ सर्वसामान्य जनतेवर परिणाम होणार आहे. एवढेच नाही तर नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती देखील बदलू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर याचा परिणाम होऊ शकतो. दरम्यान, आता आपण मे महिन्यात कोणकोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे आणि याचा सर्वसामान्यांवर कसा परिणाम होणार आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
घरगुती अन व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात होणार बदल : घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या रेटमध्ये नवीन महिन्यात बदल होणार असा अंदाज व्यक्त होत आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात केली होती. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशभरातील व्यावसायिक आणि घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारित केले जातात.
एकतर किमती कमी होतात किंवा किमती वाढवल्या जातात नाहीतर किमती कायम ठेवण्याचा निर्णय होतो. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती रिवाईज केल्या जातात. दर महिन्याप्रमाणे 1 मे ला देखील एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुधारणा होणार असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने किमतीमध्ये बदल होणार नसल्याचे म्हटले जात आहे. तथापि जर गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करायचा असेल तर यासाठी सरकारला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे आता गॅस सिलेंडरच्या किमतीत येत्या नवीन महिन्यात बदल होतो का हे पाण्यासारखे राहणार आहे.
HDFC बँकेने आपल्या विशेष एफडी योजनेला मुदत वाढ दिली : एचडीएफसी ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. सार्वजनिक क्षेत्रात एसबीआय ही सर्वात मोठी बँक आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये एचडीएफसी ही मोठी वित्तीय संस्था आहे. दरम्यान एचडीएफसीने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरेतर एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून एफडी करणाऱ्यांना नेहमी चांगला परतावा दीला जातो.
शिवाय बँकेच्या माध्यमातून काही विशेष योजना देखील चालवल्या जात आहेत. सिनिअर सिटीजन ग्राहकांसाठी देखील बँकेने विशेष FD स्कीम सुरू केली आहे. सीनियर सिटीझन केअर FD ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली एचडीएफसी ची विशेष एफडी स्कीम आहे. या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बँकेच्या माध्यमातून 7.75 टक्के एवढे व्याज दिले जात आहे.
या योजनेत पाच ते दहा वर्षांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात आणि कमाल पाच कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते. दरम्यान या विशेष FD योजनेला आता 10 मे 2024 पर्यंत मुदत वाढ देण्याचा मोठा निर्णय एचडीएफसीने घेतला आहे. अर्थातच जर ज्येष्ठ नागरिकांना एचडीएफसी च्या या एफ डी स्कीम मध्ये गुंतवणूक करायची असेल तर दहा मे पर्यंत गुंतवणूक करावी लागणार आहे.
ICICI बँक सेवा शुल्क : ICICI ही भारतातील आणखी एक मोठी प्रायव्हेट बँक आहे. RBI गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली होती यामध्ये या बँकेचा देखील समावेश होता. दरम्यान, आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या बचत खात्याशी संबंधित सेवा शुल्काचे नियम बदलले आहेत. विशेष म्हणजे बँकेने बदललेले हे नियम अजून लागू झालेले नाहीत. पण हे नियम येत्या महिन्यापासून अर्थातच 1 मे 2024 पासून लागू होणार आहेत.
या बदललेल्या नियमानुसार आपल्या महिन्यापासून बँकेच्या डेबिट कार्डसाठी ग्राहकांना ग्रामीण भागात 99 रुपये आणि शहरी भागात 200 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे. तसेच, बँकेच्या 25 पानांच्या चेकबुकसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, पण, यानंतर तुम्हाला 4 रुपये प्रति पान शुल्क भरावे लागेल. शिवाय, IMPS व्यवहाराची रक्कम प्रति व्यवहार रु. 2.50 ते रु. 15 पर्यंत ठरवण्यात आली आहे.
Yes बँकेनेही नियम बदलेत : येस बँकेने देखील नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रायव्हेट सेक्टरमधील बँकेने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार बँकेच्या बचत खात्याच्या विविध प्रकारांची किमान सरासरी शिल्लक बदलली आहे. पण याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही. तर हे नवीन नियम 1 मे 2024 पासून लागू होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून बँकेच्या प्रो मॅक्समध्ये किमान सरासरी शिल्लक 50,000 रुपये करण्यात आली आहे, तर कमाल शुल्क 1,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. बचत खाते प्रो प्लस येस रिस्पेक्ट एसए सेविंग अकाउंट आणि येस एसेन्स सेविंग अकाउंटमधील किमान सरासरी शिल्लक 25,000 रुपये आणि कमाल शुल्क 750 रुपये करण्यात आले आहे. येस बँकेचे प्रो खात्यासाठी किमान शिल्लक 10,000 रुपये आणि कमाल शुल्क 750 रुपये करण्यात आले आहे.