स्पेशल

नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहात, मग तुमच्या प्रियजनांना पाठवा नववर्षाभिनंदनाच्या ‘या’ हटके शुभेच्छा, नववर्षाच्या स्वागतासाठी खास मराठी Wishes

Published by
Tejas B Shelar

New Year 2025 Wishes : 2024 वर्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे, नवीन वर्ष येत्या काही तासात सुरू होणार आहे. या चालू वर्षात सर्वजणांनी चढउतारांचा अनुभव घेतला. या वर्षात लोकांनी जे संकल्प डोळ्यासमोर ठेवले होते ते संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. यातील अनेकांचे संकल्प पूर्ण झाले तर काही लोकांचे संकल्प अपूर्ण राहिलेत. दरम्यान आता नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षात काही नवीन संकल्प केले जाणार आहेत. ज्या गोष्टी 2024 मध्ये मिळवता आल्या नाहीत त्या गोष्टी पुढील वर्षी मिळवण्याचा अनेकांचा प्रयत्न राहणार आहे.

आता नवीन वर्ष सुरू होण्यासाठी फक्त काही तास शिल्लक राहिलें असल्याने सध्या सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, या उल्हासाच्या वातावरणात नववर्षाभिनंदनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले काही मराठी Wishes घेऊन हजर आलो आहोत. खरे तर 2024 वर्ष आता अवघ्या काही तासात संपणार आहे. यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष अर्थातच 2025 च्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

या पार्श्वभूमीवर सर्वत्र अगदीच आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात रोषणाई आहे. 31 डिसेंबरची सर्वत्र धूम आहे, अशा परिस्थितीत जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना नूतन वर्षाभिनंदनाच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर आज आम्ही सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले असेच काही मेसेजेस तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे मेसेजेस तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता अन नूतन वर्षाभिनंदनाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना देऊ शकतात.

डोळ्यात No Tear
मनात No Fear
Forget Everything and Enjoy Dear
मित्रा तुला आणि तुझ्या परिवाराला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

एक सौंदर्य, एक नवीन उत्साह ,
एक नवीन स्वप्न एक कल्पना,
एक विश्वास, एक आस्था. एक चांगला विचार.
हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात.
नवीन वर्षाच्या नवीन हार्दिक शुभेच्छा.

स्वप्ने उरलेली, या नव्या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! Happy New Year

प्रत्येक वर्ष येतं प्रत्येक वर्ष जातं… पण या नव्या वर्षात तुम्हाला सर्व काही मिळो जे तुम्हाला मनापासून हवं आहे. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.

जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो, जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो. या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.

नववर्षाभिनंदन! 2025 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!

येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!
Happy New Year Mitra

तुमचे भविष्य सोनेरी होवो, तुमचे
जीवन सोपे आणि यशस्वी होवो,
नवीन संकल्प घेऊन
नवीन वर्ष उज्वल होवो,
Happy New Year Mitra

गेलेली वर्षे विसरा,
या नवीन वर्षाचा स्वीकार करा
आपण डोके टेकवून देवाला प्रार्थना करतो,
या वर्षी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

दु:खाच्या सावलीपासून नेहमी दूर राहा,
कधीही एकटेपणाचा सामना करू नका
तुमची प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो,
हीच माझी मनापासून प्रार्थना आहे
नवीन वर्षाच्या शुभेच्छा…

हे आपल नातं असंच राहू दे,
मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहू दे
खूप सुंदर असा प्रवास होता 2024 या वर्षाचा
2025 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नूतन वर्षाभिनंदनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा!

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा-अपेक्षा घेऊन आले 2025 चे नवीन साल.
आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

नव्या या वर्षी आकाशी रंग उधळले नवे,
प्रत्येक क्षण साठव मनात होऊ दे त्यांचे थवे
2025 हे वर्ष आपणास व आपल्या परिवारास ऐशोआरामाचे जावो

येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी
तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभ दिनी
दिलसे Happy New Year!

गेल्या वर्षीच्या
फुलाच्या पाकळ्या वेचून घे रे
भिजलेली आसवे झेलून घे रे
सुख-दुःखं झोळीत साठवून घे रे
आता उधळ सारे हे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे रे
तुला व तुझ्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

दुःखं सारी विसरून जाऊ ..
सुखं देवाच्या चरणी वाहू …
स्वप्नं उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेनं नव्यानं पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नव्या या वर्षी
संस्कृती आपली जपू या
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या
नवीन वर्षाच्या दिलसे शुभेच्छा !

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन
वाईट वजा करूया
नवे संकल्प, नवे स्वप्न रंगवूया
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
Happy New Year 2025

अरे भावा चल या नवीन वर्षाचं स्वागत करूया आणि
जुन्या स्वप्नांना नव्या स्वप्नांची जोड देऊन ते फुलुवुया…
या जुन्या मित्राकडून तुला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

2024 मध्ये माझ्या सुख-दुःखात
माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे बरं…
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत
कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा बरं…
आणि पुढेही असेच आयुष्यभर
माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या एवढंचं म्हणणं मांडतो बरं
आपणास व आपल्या परिवाराला 2025 या
येणाऱ्या नवीन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा !

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..
Happy New Year 2025

इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!
Happy New Year 2025

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar