New Year Wishes 2024:- आज 31 डिसेंबर 2023 म्हणजेच 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस असून 2023 या वर्षांमध्ये आपण काय केले किंवा आपल्या आयुष्यामध्ये काय नवीन किंवा काय विशेष घडले? याचा लेखाजोखा मांडण्याचा किंवा याचा विचार करण्याचा हा दिवस म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
तसेच उद्या एक जानेवारी 2024 म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात. या नवीन वर्षामध्ये आपण कुठल्या नवीन गोष्टी करणार आहात? आयुष्याविषयी काय आपल्या भविष्यकालीन प्लॅनिंग आहेत? इत्यादी बाबत अनेक जन संकल्प करतात किंवा योजना आखल्या जातात.
यासोबतच कुठलाही सण उत्सव असो किंवा ख्रिसमस व नवीन वर्षासारखे प्रसंग असो या निमित्ताने आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना, मधील सदस्यांना ऑनलाइन पद्धतीने मेसेज पाठवून शुभेच्छा देतात व नवीन वर्ष साजरे केले जाते. याच निमित्ताने आपण आज या लेखामध्ये काही महत्त्वाचे शुभेच्छा संदेश पाहणार आहोत जे तुम्ही तुमच्या मित्र तसेच नातेवाईक व कुटुंबातील सदस्यांना पाठवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकतात.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024
1- सर्वांच्या हृदयात असू दे प्रेमाच्या भावना, नव्या वर्षात पुरी होऊ दे अधुरी ही कहाणी हीच प्रार्थना करतो होऊन नतमस्तक गरिबांना मिळू दे अन्न, वस्त्र आणि निवारा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
2- मनामनातून आज उजळले आनंदाचे लक्ष दिवे.. समृद्धीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे.. आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
3- आपलं नातं असंच राहू दे, मनात आठवणींची ज्योत अखंड ठेवत राहू दे, खूप सुंदर असा प्रवास होता 2023 या वर्षाचा 2024 मध्ये देखील अशीच सोबत कायम राहू दे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
4- पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फुलांचे ही व्हावे गाणे असे जावे वर्ष नवे.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
5- घेऊन नवी उमेद, नवी आशा, होतील मनातील पूर्ण इच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
6- येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभ दिनी!
7- नव्या यावर्षी संस्कृती आपली जपूया थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
8-गेले ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेऊन आले 2024 साल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
9-पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे सोबत माझ्या नव्या शुभेच्छा! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
10- 31 तारखेला मजा करा आणि नवीन वर्षात भरपूर काम करा… नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
11- मागच्या वर्षीच्या फुलाच्या पाकळ्या वेचून घे, भिजलेली आसवे झेलून घे, सुखदुःख झोळीत साठवून घे, आता उधळ सारे हे आकाशी नववर्षाचा आनंद भरभरून घे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
12- दुःख सारी विसरून जाऊ.. सुख देवाच्या चरणी वाहू.. स्वप्न उरलेली… नव्या यावर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू.. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
13- संकल्प करूया साधा, सरळ आणि सोपा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करू या हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
14- मला अपेक्षा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.. आपली सर्व स्वप्न सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील…. नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
15- तुमच्या या मैत्रीची साथ यापुढेही असेच कायम असू द्या नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपूया.. येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!