पुणे शहराचा विकास पाहिला तर हे एक जलद विकसित होणारे शहर असून या ठिकाणी औद्योगिक विकास हा मोठ्या प्रमाणात झाला असून त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून वाहतूक कोंडीची समस्या देखील पुण्यात जास्त असल्यामुळे रिंग रोड प्रकल्पाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. तसेच नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे देखील एक ऑगस्ट रोजी उद्घाटन केले.
पुणे महानगरपालिकेचा विचार केला तर महानगरपालिकेने आता प्रवाशांसाठी सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात व शहराच्या वाहतूक कोंडीच्या दृष्टिकोनातून आणखी मेट्रोचे जाळे विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे व त्या अनुषंगाने एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आहे.
पुण्यात ४५ किमीचा उभारला जाणार मेट्रो प्रकल्प
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्ट रोजी गरवारे ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते सिविल कोर्ट या 16 किलोमीटर मेट्रो मार्गीकेचे उद्घाटन झाले. त्यानंतर आता पुणे महापालिकेने शहरातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याकरिता महानगरपालिकेच्या माध्यमातून महामेट्रो कडून एचसीएमटीआरसह सात मार्गांवरील 80 किलोमीटर मेट्रोचा डीपीआर म्हणजे सविस्तर प्रकल्प आराखडा देखील तयार करून घेतला आहे.
जर आपण पुणे शहरातील पहिला टप्पा पाहिला तर तो 32 किलोमीटरचा आहे व आता दुसऱ्या टप्प्यातील 44.7 किलोमीटर मार्गावर मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. जवळजवळ 45 किलोमीटरचा हा मेट्रो मार्ग असणार असून तो खडकवासला मार्गे स्वारगेट, हडपसर, खराडी आणि पौडफाटा आणि त्या ठिकाणहून वारजे माणिकबाग तसेच वनाज ते रामवाडी मार्गावरील वाघोली आणि चांदणी चौकापर्यंतच्या विस्तारित मार्ग यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
या प्रकल्पाला स्थायी समितीकडून मंजुरी
जवळजवळ 45.7 किलोमीटर मेट्रोमार्गाच्या मंजुरी करिता दोन स्वतंत्र प्रस्ताव प्रकल्प विभागाच्या माध्यमातून स्थायी समितीच्या मंजुरीकरिता ठेवण्यात आले होते व शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले.
आता मुख्य सभेची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव महामेट्रोमार्फत राज्य व केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरी करिता पाठवला जाण्याची शक्यता आहे. या नवीन मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड म्हणजेच जमिनीवरून जाणार आहे. स्थायी समितीने मंजुरी दिलेली आहे या 44.7 किलोमीटर मेट्रो मार्गाकरिता एकूण १०८६६ कोटी खर्च येणार असून त्यामध्ये…
1- वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली
या मार्गाकरिता– 3609 कोटी2- खडकवासला ते स्वारगेट, हडपसर ते खराडी, पौडफाटा ते वारजे माणिकबाग– या मार्गाकरिता नऊ हजार 74 कोटींचा खर्च हा प्रस्तावित आहे.
मंजुरी मिळालेले मेट्रो मार्ग
1-खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवासला–
हा मार्ग एकूण 25.8 किलोमीटरचा आहे.
2- एसएनडीटी ते वारजे– एकूण अंतर सात किलोमीटर
3- रामवाडी ते वाघोली– एकूण अंतर 11.2 किलोमीटर
4- वनाज ते चांदणी चौक– एकूण अंतर 1.5 किलोमीटर