स्पेशल

म्हाडाने घेतला मोठा निर्णय ! आता जास्तीत जास्त व्यक्तींना मिळणार घर

Published by
Ajay Patil

मुंबई किंवा पुणे व इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या म्हाडा सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सोडतीची खूप मोठी मदत होत असते. या सोडतींच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरांमध्ये घरे उपलब्ध करून दिले जातात.

नुकतीच आपण म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या सोडतीचा विचार केला तर सप्टेंबर 2024 मध्ये म्हाडाच्या माध्यमातून सोडत जाहीर करण्यात आलेली आहे

व या सोडतीसाठी प्रतीक्षा यादीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. अगोदर प्रतीक्षा यादी ही दहा टक्के इतकी होती व त्यामध्ये आता वाढ करत  50% नी वाढवण्यात आलेली आहे. यामध्ये नक्कीच  प्रतीक्षा यादीतील व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.

 म्हाडाच्या सोडतीतील प्रतीक्षा यादीत करण्यात आली 50 टक्क्यांनी वाढ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून सप्टेंबर 2024 करिता जाहीर करण्यात आलेल्या सोडतीसाठी प्रतीक्षा यादीमध्ये वाढ करण्यात आली असून ती 50% इतकी वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे आता दहा घरांमध्ये प्रतीक्षा यादीतील पाच विजेते जाहीर करण्यात येणार आहेत.

मागच्या वर्षी जर प्रतिक्षा यादीची स्थिती पाहिली तर दहा घरात मागे एक विजेता या प्रकारची प्रतीक्षा यादी होती.  आता या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला असून सोडत निघण्याआधीच पात्रता निश्चिती करण्यात येत आहे. त्यामुळे सोडतीनंतर घराचे वितरण करताना मोठ्या संख्येने विजेते पात्र ठरण्याचा मुद्दा उरत नसल्याचे स्पष्ट करीत प्रतीक्षा यादी रद्द करण्याचा विचार पुढे आला होता.

प्रतीक्षा यादी कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

कारण घरांच्या वितरणामध्ये प्रतीक्षा यादीतील घरांचे वितरण जेव्हा केले जाते त्यामध्ये भ्रष्टाचार होतो असा आरोप करण्यात येऊन प्रतिक्षा यादी रद्द करावी अशी मागणी करण्यात आलेली होती.परंतु बऱ्याचदा सोडत यादी पात्र ठरलेले विजेते काही कारणांनी घरे नाकारू शकतात  व त्यामुळे अशा घरांसाठी इतरांना संधी मिळावी म्हणून प्रतीक्षा यादी कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

2023 च्या सोडतीमध्ये दहा टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्यात आलेली होती. म्हणजेच प्रत्येक दहा घरामागे प्रतीक्षा यादीवरील 1 विजेता असे त्याचे स्वरूप होते. अशाप्रकारे प्रतीक्षा यादी कमी असल्यामुळे सामाजिक आरक्षण व इतर राखीव प्रवर्गातील घरांची विक्री होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या व घरे विकली गेली नव्हती.

या घरांसाठी अर्ज मोठ्या प्रमाणावर असून देखील प्रतीक्षा यादी कमी असल्याने घरांची विक्री होऊ शकली नाही व याचा फटका म्हाडाला बसला होता. त्यामुळे आता 13 सप्टेंबर 2024 च्या सोडतीकरिता प्रतीक्षा यादी 10 टक्क्यांवरून 50% करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली आहे.

या निर्णयामुळे आता प्रत्येक दहा घरामागे प्रतीक्षा यादीतील पाच विजेते जाहीर केले जाणार आहेत. अशाप्रकारे प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची संख्या वाढविल्यामुळे घरे विक्रीविना राहण्याचे प्रमाण आता कमी होईल.

Ajay Patil