स्पेशल

तरुणांसाठी आनंदाची बातमी ! NPCIL मध्ये ‘या’ पदाच्या रिक्त जागांसाठी निघाली मोठी भरती, वाचा सविस्तर

NPCIL Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एनपीसीआयएल अर्थातच न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तब्बल 128 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पद भरतीसंदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- देशातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रात ! ‘या’ दोन शहरातील प्रवास फक्त 15 मिनिटात, 12 किलोमीटरच्या अंतरासाठी 14 हजार कोटींचा खर्च, पहा….

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

डेप्युटी मॅनेजर (HR), डेप्युटी मॅनेजर (F&A), डेप्युटी मॅनेजर (C&MM), डेप्युटी मॅनेजर (कायदेशीर), आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदाच्या रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

किती पदांसाठी होणार भरती

डेप्युटी मॅनेजर (HR) ४८, डेप्युटी मॅनेजर (F&A) ३२, डेप्युटी मॅनेजर (C&MM) ४२, डेप्युटी मॅनेजर (कायदेशीर) २ आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक ४ अशा एकूण 128 रिक्त जागांची भरती या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

विविध विभागातील डेप्युटी मॅनेजर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 18 ते 30 वर्षे वयोगटातील असणे गरजेचे आहे. तसेच कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 18 ते 28 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रते संदर्भात मात्र आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवाराने एकदा अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ 5 रुपयाचा स्टॉक पोहचला 590 रुपयावर, 78 हजाराचे बनलेत 1 कोटी; पहा डिटेल्स

अर्ज कसा करावा लागणार?

या पदासाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. http://www.npcilcareers.co.in या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज सादर करू शकणार आहेत.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक?

या पदांसाठी 12 मे 2023 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच 29 मे 2023 पर्यंत उमेदवाराला आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन सादर करता येणार आहे.

जाहिरात कुठं पाहणार?

या पदभरतीची अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी उमेदवार http://www.npcilcareers.co.in आणि npcil.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकतात. 

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! म्हाडाच्या कोकण मंडळाची पुन्हा नवीन सोडत निघणार; डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार येथे घर होणार उपलब्ध, केव्हा निघणार जाहिरात?

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts