स्पेशल

‘या’ तारखेला जन्मलेले लोक फारच कमी बोलतात, पण आकर्षक पर्सनॅलिटी आणि केअरिंग नेचरमुळे सर्वांना आपल्याकडे खेचतात !

Published by
Tejas B Shelar

Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचाचं एक महत्त्वपूर्ण भाग. अंकशास्त्र असे म्हणते की व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ सांगितले जाऊ शकते.

व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूळांक काढला जातो आणि याच मुळांकावरून व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्व अधोरेखित होत असते. हाच मुळांक व्यक्तीचे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ सांगतो. मुळांक हा एक ते नऊ दरम्यान असतो.

व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून हा मुलांक निघत असतो. दरम्यान आज आपण मूळांक कसा काढायचा आणि कोणत्या मूळांकाचे लोक फारच कमी बोलतात? याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुळांक कसा काढला जात असतो?
अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरून मूळांक देतो. उदाहरणार्थ कोणत्याही महिन्याच्या अकरा तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुळांक 1+1 = 2 असतो. तसेच कोणत्याही महिन्याच्या दोन तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक दोन असतो. मुळांक हा एक ते नऊ या दरम्यान असतो.

या मुळांकाचे लोक फारच कमी बोलतात
अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूळांक दोन असतो म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेले लोक फारच कमी बोलतात. या चार तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूळांक दोन असतो.

हे लोक फारच कमी बोलतात. या मुळांकाचा स्वामी ग्रह चंद्रमा असतो. चंद्र हा मनाचा कारक असतो. या चार तारखांना जन्मलेल्या लोकांवर अर्थातच मुलांक 2 असणाऱ्या लोकांच्या जीवनावर चंद्राचा खोल प्रभाव दिसून येतो. चंद्राच्या प्रभावामुळे हे लोक भावुक स्वभावाचे असतात.

चंद्र त्यांना केवळ भावनांनी परिपूर्ण बनवत नाही तर त्यांना काळजी घेणारा स्वभाव देखील देतो. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची खूप काळजी घेतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतात.

या मुलांकाच्या लोकांना एखाद्यावर अवलंबून राहण्याची सवय असते. कोणत्याही कामासाठी ते नेहमी त्यांच्या जोडीदारावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर किंवा मित्रावर अवलंबून असतात.

या मूलांकाच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असते. ते क्रिएटिव्ह प्रकारचे असतात आणि कलेच्या क्षेत्रात गेल्यास त्यांना नावही मिळते. त्याला नवीन गोष्टी शिकायला आणि प्रयत्न करायला आवडते.

लेखन, अभिनय, कला या क्षेत्रात हे लोक नाव कमावतात. या मुलांकाच्या लोकांच्या वागण्यातून एक गोष्ट लक्षात येते की त्यांना कमी बोलायला आवडते. हे लोक जास्त बोलत नाही आणि गरज असेल तिथेच मत व्यक्त करतात. मात्र, कमी बोलण्याच्या त्यांच्या सवयीमुळे अनेक वेळा त्यांना त्यांचे विचार सहजासहजी मांडता येत नाहीत.

ते अतिशय शांत स्वभावाचे असतात आणि इतरांसमोर त्यांचे मत मांडण्यास लाजत नाहीत. या लोकांना शक्य तितक्या कमी शब्दांत व्यक्त व्हायला आवडते. त्यांच्या या सवयीमुळे अनेक वेळा लोक त्यांना रहस्यमय स्वभावाचे लोक समजतात.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar