स्पेशल

320 किमीची रेंज अन किंमत फक्त 80 हजार! Ola ने लाँच केली Gen 3 इलेक्ट्रिक स्कूटर

Published by
Tejas B Shelar

Ola New Gen 3 Electric Scooter : भारतात गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. देशात इलेक्ट्रिक स्कूटर देखील मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. देशातील विविध कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. ओला इलेक्ट्रिकने देखील भारतीय बाजारात आपल्या ग्राहकांसाठी विविध इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत.

भारतीय मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिकच्या स्कूटरची मोठी मागणी असून ओला इलेक्ट्रिकने नुकतीच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज बाजारात लॉन्च केली आहे. ग्राहकांसाठी कंपनीने Gen 3 इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन रेंज लाँच केली आहे.

जनरेशन 3 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या नवीन स्कूटरच्या या श्रेणीत ओला एस 1 प्रो, ओला एस 1 प्रो प्लस, ओला एस 1 एक्स आणि ओला एस 1 एक्स प्लस स्कूटर लाँच करण्यात आल्या आहेत. म्हणजेच कंपनीने या नव्या स्कूटरचे चार वेरिएंट लॉन्च केले आहेत.

हे सर्व नवीन ओला स्कूटर कंपनीच्या नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम मूव्हओएस 5 वर कार्य करतात. यापूर्वी, हब मोटर्स स्कूटरमध्ये वापरली जात होती, परंतु आता कंपनीने नवीन स्कूटरमध्ये मिड -ड्राईव्ह मोटर आणि इंटिग्रेटेड मोटर कंट्रोल युनिट वापरली आहे. दरम्यान आता आपण या नवीन Ola Gen 3 स्कूटरची विशेषता, त्याचे फीचर्स आणि किमतीबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

ओलाच्या नवीन स्कूटरच्या विशेषता

ओलाने Gen 3 प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या या नवीन श्रेणीसाठी वायर टेक्नॉलॉजीद्वारे ब्रेक पेटंट केले आहे. ही प्रणाली ब्रेक लीवर सेन्सरचा वापर करून ब्रेक पॅड आणि ब्रेक पॅडच्या मोटर प्रतिरोधात संतुलन राखण्यासाठी कार्य करते, ज्यामुळे श्रेणी 15 टक्क्यांनी वाढते.

जनरेशन 3 च्या सर्व स्कूटरमध्ये सुरक्षिततेसाठी अँटी -लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. यासह, मागील मॉडेल्सच्या तुलनेत या नवीनतम मॉडेल्सची कॉस्ट 31 टक्क्यांनी कमी झाली आहे. या व्यतिरिक्त, पीक पॉवरमध्ये 53 टक्के वाढ झाली आहे.

कंपनीचा असा दावा आहे की, प्रो प्लस व्हेरिएंटची उच्च गती 141 किमी प्रतितास आहे आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 320 किमी पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. आता आपण या स्कूटर च्या किमती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कशा आहेत किंमती?

ओला S1X 2 kWh व्हेरिएंटची किंमत 79,999 Rs रुपये निश्चित केली गेली आहे, आणि 4kWh व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये आहे आणि 4kWh च्या टॉप मॉडेल ची किंमत 99 हजार 999 रुपये एवढी आहे. ओला S1X 4 kWh प्रकाराची किंमत 1,07,999 रुपये आहे.

तसेच या ओला स्कूटरच्या 3 केडब्ल्यूएच प्रकाराची किंमत 1,14,999 रुपये आहे, 4 केडब्ल्यूएच प्रकारांची किंमत 1,34,999 रुपये आहे. Ola S1 प्रो प्लस व्हेरिएंटचा 4 केडब्ल्यूएच प्रकारांची किंमत 1,54,999 रुपये आणि 5.5 केडब्ल्यूएच प्रकारांची किंमत 1,69,999 रुपये आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम किमती आहेत. ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com