Old Pension News : राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. आता कर्मचारी उद्यापासून कामावर हजर होणार आहेत. खरं पाहता जुनी पेन्शन योजना लागू करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून अर्थातच मंगळवारपासून संपाची सुरुवात केली होती.
राज्य कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील असं म्हटल होत. आज संपाचा सहावा दिवस होता आणि शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून आज राज्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे.
यामुळे नेमकं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत काय घडलं, काय तोडगा काढला गेला? जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्य शासनाने मान्य केली का? यासारखे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवर विस्तृत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या आगामी तीन महिन्यांमध्ये राज्य शासनाकडून पूर्ण केल्या जातील अस आश्वासन शिंदे फडणवीस सरकारने दिले आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! शिंदे-फडणवीस सरकारला झटका; राज्य कर्मचाऱ्यांच्या संपात ‘या’ दिवशी राजपत्रित अधिकारी देखील होणार सामील
यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने विश्वास काटकर यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये एकूण 16 जणांचा समावेश होता.
गेल्या काही दिवसांपासून शासनासोबत कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची त्यांच्या मागणी संदर्भात चर्चा सुरू होती. अखेर आज शासनाच्या आश्वासनानंतर संपाच्या सहाव्या दिवशी संपाला पूर्णविराम लागला आहे. यामुळे आता उद्यापासून संपकरी कर्मचारी कामावर रुजू होणार असून सामान्य जनतेला आता शासकीय सेवांसाठी ताटकळत राहावे लागणार नाही एवढे नक्की.
हे पण वाचा :- पुणे-बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्ग; रेडिरेकनरच्या दुप्पट की चौपट नेमका मोबदला किती मिळणार? पहा