स्पेशल

अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी विकसित केलं कांदा लागवडीचे यंत्र; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा

Published by
Ajay Patil

Onion Farming : राज्यात गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसायात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिक उत्पादनात घट झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांना मजूरटंचाईचा देखील मोठा फटका बसत आहे.

यामुळे आता शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाला मोठी पसंती लाभत असून शेतकरी बांधव शेतीची सर्व कामे यंत्राने करण्यास उत्सुक आहेत. आता शेतीत ट्रॅक्टर चलीत यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. अशातच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील दोन संशोधकांनी कांदा लागवडीसाठी यंत्राची निर्मिती केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की राज्यात खरीप, लेट खरीप आणि रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या महाराष्ट्राची कांदा उत्पादनात मोठी मक्तेदारी आहे. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! तुरीचे दर 11000 वर पोहोचतात केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, दरात घसरण होण्याची दाट शक्यता

देशाच्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्यातील कांदा उत्पादकांना कांदा पीक परवडणार राहिलेलं नाही. याच मुख्य कारण म्हणजे कांदा लागवडीसाठी मजूर टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कांदा लागवड करण्यासाठी मजुरांची असलेली कमतरता शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ घडवून आणत आहे. हेच कारण आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील दोन संशोधकांनी कांदा लागवडीचे यंत्र विकसित केल आहे. शेतकरी कुटुंबातील सौरभ कदम आणि प्रशांत देशमुख नामक संशोधकांनी हे यंत्र तयार केल आहे. या यंत्रामुळे कांदा लागवडीचे काम सोपे होत आहे. 

हे पण वाचा :- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव? वाचा….

विशेष बाब म्हणजे अलीकडेच या यंत्राला थेट आफ्रिकेतून मागणी आली असल्याचे या तरुण संशोधकांनी नमूद केले आहे. सौरभ आणि प्रशांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कांदा लागवड यंत्राच्या मदतीने अवघ्या पाच तासात एक एकर कांदा लागवड करता येते.

तसेच या यंत्राने लागवड केली तरी देखील दोन रोपांतील आणि दोन ओळींतील अंतर योग्य राहतं. म्हणजे ज्या पद्धतीने मजूर लागवड करतात त्याच पद्धतीने या यंत्राने लागवड करता येणे शक्य आहे.

त्यामुळे कांद्याचं वजन, आकार आणि रंग एकसारखा राहतो, असा दावा या संशोधकांनी केला आहे. निश्चितच या कांदा लागवड यंत्रामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मजूर टंचाईमुळे त्रस्त व्हावे लागणार नाही. तसेच कांदा लागवडीसाठी येणारा हजारो रुपयांचा खर्च यामुळे वाचणार आहे.

हे पण वाचा :- आज पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

Ajay Patil