कांदा पुन्हा गडगडला, शेतकरी चिंतेत ! पुणे, अहिल्यानगरच्या बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? पहा….

सध्या कांदा निर्यातीसाठी सरकारने 20 टक्के निर्यात शुल्क लागू केलेले आहे आणि याचाच फटका कांदा उत्पादकांना बसत असून सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाहीये. यामुळे देशभरातील शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत. महाराष्ट्र हा कांद्याचा सर्वात मोठा पुरवठादार. यामुळे कांदा बाजारभावात झालेली घसरण ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरत आहे.

Tejas B Shelar
Published:
Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra : विधानसभा निवडणुका झाल्यात की कांद्याचे भाव पडू शकतात असा अंदाज होता. यानुसार आता कांदा बाजार भावात घसरण सुरू झाली आहे. बाजारातील अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कांदा निर्यातीसाठी सरकारने 20 टक्के निर्यात शुल्क लागू केलेले आहे आणि याचाच फटका कांदा उत्पादकांना बसत असून सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाहीये.

यामुळे देशभरातील शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत. महाराष्ट्र हा कांद्याचा सर्वात मोठा पुरवठादार. यामुळे कांदा बाजारभावात झालेली घसरण ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरत आहे. राज्यातील बाजारांमध्ये कांद्याचे सरासरी दर हे 1500 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

यामुळे पिकासाठी आलेला खर्च आता भरून कसा काढायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये सध्या कांद्याला काय दर मिळतो याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमधील कांदा दर

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती : अहिल्यानगर एपीएमसी मध्ये आज लाल कांद्याला किमान 400, कमाल 2950 आणि सरासरी 1975 असा भाव मिळाला.

छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती : मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळाले. या एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान 500 कमाल, पंचवीसशे आणि सरासरी 1500 असा भाव मिळाला. या ठिकाणी आज कांद्याची 4213 क्विंटल एवढी आवक झाली होती.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव एपीएमसी मध्ये आज रविवारी लाल कांद्याला किमान 2000, कमाल 3000 आणि सरासरी 2200 असा भाव मिळाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज विदर्भातील नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान चार हजार, कमाल 5000 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : पश्चिम महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या बाजारपेठेत आज कांद्याला सर्वाधिक कमी सरासरी भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 200, कमाल 2110 आणि सरासरी 1500 असा भाव मिळाला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या ठिकाणी चिंचवड कांद्याला किमान 1100, कमाल 3210 आणि सरासरी 2200 असा भाव मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe