स्पेशल

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पुणे येथील संशोधन केंद्रात कांद्याचे नवीन वाण होणार विकसित; युरोपात निर्यातीसाठी फायदेशीर; एकाचं कांद्याचे वजन तब्बल 250 ग्रॅम, पहा…..

Published by
Ajay Patil

Onion Variety : कांदा हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उत्पादित होणारं एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यात सर्वाधिक शेती होते आणि महाराष्ट्रातूनच मोठ्या प्रमाणात कांद्याचीं निर्यात देखील आपल्या देशात होत आहे. अशातच आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. खरं पाहता, राज्यातून जरी मोठ्या प्रमाणात कांद्याचे निर्यात होत असली तरी देखील युरोपाची बाजारपेठ अजून आपल्याला काबीज करता आलेली नाही.

युरोपातील बाजारात मोठ्या कांदाची मागणी असते. मात्र आपल्याकडे जास्तीत जास्त शंभर ते दीडशे ग्रॅम वजनाच्या, आकाराच्या कांद्याचे उत्पादन हे होत असते. युरोपात मात्र 200 ते 250 ग्रॅम पर्यंत वजन असलेल्या कांद्यालाच मागणी असते. अशा परिस्थितीत युरोपात आपल्या देशातून फारशी कांदा निर्यात या ठिकाणी पाहायला मिळत नाही.

हीच बाब लक्षात घेऊन मात्र देशातील शास्त्रज्ञांनी कांद्याचे नवीन वाण विकसित करण्यासाठी संशोधन सुरु केले आहे. युरोपात कांदा निर्यातीला संधी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने नवीन जातीसाठी महाराष्ट्रातील संशोधन केंद्रात संशोधन सुरू आहे. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे या ठिकाणी युरोपात निर्यातीसाठी सक्षम असणाऱ्या कांद्याच्या नवीन वाणासाठी संशोधन सुरू असल्याची माहिती इंडियन सोसायटी ऑफ अल्म्स चे अध्यक्ष तथा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माझी कुलगुरू डॉक्टर के ई लवांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

खरं पाहता, युरोपात लाल आणि पांढरा अशा दोन्ही रंगांच्या कांद्याला मोठी मागणी आहे. मात्र कांद्याचे वजन त्या ठिकाणी 200 ते 250 ग्रॅम बनायला पाहिजे. अशा परिस्थितीत नवीन वाण शोधण्याची गरज भारतीय संशोधकांना भासू लागली आणि याच अनुषंगाने राजगुरुनगर या ठिकाणी कांद्याच्या नवीन वाणावर संशोधन सुरू झाले आहे. येत्या काही वर्षात हे संशोधन पूर्ण होईल आणि युरोपियन कांदा बाजारपेठ भारतीय कांद्याने काबीज केली जाईल हीच आशा आता जाणकार लोकांकडून वर्तवली जात आहे. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil