Panjab Dakh Havaman Andaj 2023 : पंजाबरावं डख यांचा हवामान अंदाज पुन्हा एकदा काळ्या दगडावरील पांढरी रेष सिद्ध झाला आहे. पंजाबराव जसे बोलले तसाच पाऊस पडला. म्हणजेच नेहमीप्रमाणे यावेळी देखील डख यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असल्याचा दावा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एक एप्रिलच्या सुमारास डख यांनी आपला हवामान अंदाज आपल्या अधिकृत यूट्यूब चैनलवर दिला होता.
यामध्ये त्यांनी सहा एप्रिल पासून पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याचा आपला अंदाज बांधला होता. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात देखील त्यांनी पावसाबाबत आपला अंदाज सार्वजनिक केला होता आणि त्यानुसार गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवलं होतं. एप्रिल महिन्यात देखील त्यांनी सहा एप्रिल पासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू होईल असा अंदाज बांधला होता. यानुसार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत मोठी अपडेट; शासन निर्णय निर्गमित, पहा….
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल पासून महाराष्ट्रातील कोकण, अहमदनगर, नासिक, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, बीड, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भोकरदन, चाळीसगाव या भागात पाऊस पडेल. म्हणजेच राज्यात जवळपास सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी बांधला होता. त्यानुसार आता राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे.
अशा परिस्थितीत पंजाबराव यांनी येणाऱ्या दिवसांबाबत काय अंदाज व्यक्त केला आहे? याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता शेतकऱ्यांसहित सामान्य नागरिकांमध्ये आहे. दरम्यान आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जवळपास 17 एप्रिल पर्यंत हवामान खराब राहू शकते.
हे पण वाचा :- मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडा ‘या’ महिन्यात काढणार 4 हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात, पहा….
यामध्ये 14 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता आहे. 14 एप्रिल पासून मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात अधिक पाऊस राहणार आहे. अर्थातच मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात पाऊस उघडीप देईल अशी शक्यता आहे. निश्चितच मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार असला तरी देखील १४ एप्रिल अर्थातच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मराठवाड्यातील आणि विदर्भातील नागरिकांना पावसातच साजरी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे डख यांनी मे महिन्यात देखील अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. मे महिन्यात एकूण दोन अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे मत डख यांनी व्यक्त केले आहे. मात्र हा पाऊस कुठे पडेल, कोणत्या भागात पडेल याबाबत त्यांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. येत्या काही दिवसात मात्र याबाबत देखील पंजाबराव सविस्तर अशी माहिती देणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; अखेर ‘या’ रेल्वे स्थानकांच्या नावात झाला बदल, पहा कोणती आहेत स्थानके आणि काय…