Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. राज्यात प्रामुख्याने गहू आणि हरभरा पिकाची हार्वेस्टिंग सुरु असून काही भागात शेतकरी बांधवांनी हरभरा पिकाची हार्वेस्टिंग देखील उरकली आहे. अशातच आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. राज्यातील हवामानात मोठा बदल होणार असून पुढल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव यांनी ही शक्यता वर्तवली असून हा अंदाज सत्यात उतरला तर यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. पंजाबराव डख यांनी आज 27 फेब्रुवारी रोजी मार्च महिन्यातील आपला हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, येत्या पाच दिवसांत म्हणजेच 5 मार्चपासून राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे.
पाच ते दहा मार्च दरम्यान हवामानातील बदल कायम राहणार असून या कालावधीत पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांनी रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या दोन्ही मुख्य पिकांची लवकरात लवकर काढणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. पंजाबरावांच्या मते, 5 मार्चपासून महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र म्हणजेच नंदुरबार धुळे जळगाव या तीन जिल्ह्यात तसेच अहमदनगर, शिर्डी, नासिक, माजलगाव, शिरूर या भागात पाऊस पडणार आहे.
याशिवाय पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यात देखील या कालावधी दरम्यान पावसाची शक्यता आहे. म्हणजेच एकंदरीत 5 मार्च ते 10 मार्च दरम्यान महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, नासिक व अहमदनगर या जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे. सरासरी एक इंच पर्यंत पाऊस या कालावधीमध्ये कोसळू शकतो असं देखील त्यांनी नमूद केल आहे. निश्चितच पंजाबरावांचा हा अंदाज जर सत्यात उतरला तर रब्बी हंगामातील पिकांची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या काढणीसाठी आलेल्या हरभरा आणि गहू पिकाची लवकरात लवकर काढणी करण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक राहणार आहे. यासोबतच पंजाबरावांनी शेतकऱ्यांना एक मोठा सल्ला देखील दिला आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, शेतकरी बांधवांनी दरवर्षी होळीच्या सणाला विशेषता होळी होऊन दोन दिवसांनी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा कोसळतोच हे लक्षात ठेवायचे आहे.
यामुळे या कालावधीपूर्वी शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत. या अनुषंगानेच आपल्या शेती कामाचे नियोजन शेतकऱ्यांनी आखावे. एकंदरीत पंजाब रावांनी वर्तवलेला हा अंदाज महाराष्ट्रातील संबंध शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाचा असून शेतकरी बांधवांनी आपल्या काढणीसाठी आलेल्या गहू, हरभरा पिकांची लवकरात लवकर हार्वेस्टिंग करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवणे आवश्यक राहणार आहे.
पंजाब रावांनी हा अंदाज शेतकी अधिकारी श्री चव्हाण साहेब यांच्यासोबत झालेल्या फोनवरील संभाषणादरम्यान वर्तवला आहे. तुम्हाला या संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.