मोठी बातमी ! उद्या 4 वाजेपासून महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढणार, परतीचा पाऊस ‘इतके’ दिवस झोडपणार

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या चार वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घ्यावीत. सोयाबीन काढणीची कामे उरकून घ्यावीत. कारण की उद्या चार वाजेपासून पावसाला सुरुवात होणार आहे. राज्यात ठीक ठिकाणी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. नऊ ऑक्टोबर सायंकाळी चार वाजेपासून ते 17 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. या नवीन हवामान अंदाजात पंजाब रावांनी उद्यापासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होणार असा दावा केला आहे.

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या चार वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घ्यावीत. सोयाबीन काढणीची कामे उरकून घ्यावीत. कारण की उद्या चार वाजेपासून पावसाला सुरुवात होणार आहे.

राज्यात ठीक ठिकाणी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. नऊ ऑक्टोबर सायंकाळी चार वाजेपासून ते 17 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

या काळात रोज भाग बदलत पाऊस पडेल असे म्हटले जात आहे. हा शेवटचा पाऊस राहणार आहे. हा परतीचा पाऊस राज्यात चांगलाच धुमाकूळ घालणार असा अंदाज आहे. मात्र हा पाऊस रब्बी हंगामासाठी मोठा फायदेशीर ठरेल.

रब्बी हंगामातील हरभरा, गहू सारख्या पिकांसाठी हा परतीचा पाऊस वरदान ठरणार असाच दावा पण पंजाबरावांच्या माध्यमातून केला जात आहे. खरंतर परतीचा पाऊस उद्यापासून सक्रिय होणार आहे.

मात्र आज 8 ऑक्टोबर रोजी राज्यातील सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, हिंगोली या भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. या भागात आज मध्य रात्रीपासूनच पावसाची हजेरी लागणार असा अंदाज आहे. मात्र पावसाची व्याप्ती ही उद्यापासून वाढणार आहे.

9 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, जालना, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे.

मात्र या कालावधीत राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण फारच कमी राहण्याची शक्यता आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 10 ऑक्टोबर पर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहील आणि 10 ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर वाढणार असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.

एकंदरीत उद्यापासून राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता आहे. तसेच विदर्भात 10 ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेती कामांचे नियोजन करावे असा सल्ला देण्यात आला आहे.

उद्या चार वाजेपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज आणि उद्या चार वाजेपर्यंत शेतीमधील कामे उरकून घेणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe