Panjabrao Dakh : पूर्वी हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी विशिष्ट पद्धत नव्हती. पण काळाच्या ओखात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वावर वाढला. अशातच हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी देखील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड लाभली. आता सॅटेलाईटचा वापर करून हवामानाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मदतीने तसेच काही खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांच्या मदतीने वर्तवला जात आहे.
पूर्वी मात्र शेतकरी बांधव निसर्गाच्या संकेतावरून पाऊस कधी पडेल याचा ढोबळमानाने अंदाज बांधत असत. विशेष बाब म्हणजे पूर्वीच्या शेतकऱ्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरत. शेतकरी बांधव पूर्वी निसर्गाच्या संकेतावरून अंदाज बांधत शेतीची कामे करत असत.
दरम्यान पंजाबराव डख, परभणीचे विख्यात हवामान तज्ञ यांनी देखील निसर्गाच्या संकेतावरून पाऊस कधी पडतो हे कसं ओळखायचं? याविषयी मोठी माहिती शेतकऱ्यांसाठी सार्वजनिक केली आहे. आज आपण पंजाब रावांनी सांगितलेल्या याच पद्धतीची माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
पंजाबरावांच्या मते जर मृग नक्षत्राच्या कालावधीत सुटणाऱ्या वाऱ्यात झाडावरील चिमण्या, धुळीत आंघोळ करत असतील तर त्यापुढील तीन दिवसात हमखास पाऊस कोसळतो.
याशिवाय, सूर्य मावळताना जर सूर्याभोवती असलेल्या आभाळ तांबड्या कलरचं झालं तर पावसाची शक्यता तयार होते. अशी परिस्थिती उद्भवल्यास पुढील तीन दिवसात पाऊस हा पडणारच असा अंदाज बांधला जात असल्याची माहिती पंजाब रावांनी दिली आहे.
तसेच, घरात, प्रांगणात असलेल्या विजेच्या लाईटवर कीटक मोठ्या प्रमाणात येऊ लागले की पावसाची शक्यता तयार होते.
जून महिन्यामध्ये जर सूर्यावर तपकिरी कलर आला तर समजायचं की पुढील चार दिवसात पाऊस हा येणारच.
याशिवाय पंजाब रावांनी रंग बदलणारा सरडा जर आपल्या डोक्यावर लाल रंग आणत असेल तर हे पाऊस पडण्याचे संकेत असल्याचे सांगितले आहे. सरड्याच्या डोक्यावर लाल रंग तयार झाला म्हणजेच पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता तयार होते.
याशिवाय घोरपड ज्याला इंडियन लिझार्ड म्हटलं जात. ही घोरपड जर बिळाच्या बाहेर तोंड काढून बसत असेल तर तेथून पुढील चार दिवसांपर्यंत पावसाची शक्यता तयार होते.
तसेच ज्यावर्षी चिंचेच्या झाडाला अधिक चिंचा लागतात त्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळत असतो. त्यावर्षी अधिक पाऊस पडतो अस डख यांनी सांगितले आहे.