Panjabrao Dakh News : पंजाबरावांचा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि तातडीचा मेसेज समोर आला आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपल्या अधिकृत youtube चैनल वर महाराष्ट्रातील हवामानाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर राज्यातील हवामानात नुकताच एक महत्त्वाचा बदल झाला असून पुन्हा एकदा डिसेंबर सारखी परिस्थिती पाहायला मिळू शकते असे चित्र तयार होताना दिसतय.
खरंतर, गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असून काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात जसा पाऊस झाला तसाच अवकाळी पाऊस पुन्हा हजेरी लावणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
दरम्यान भारतीय हवामान खात्यातील काही तज्ञांनी आगामी काही दिवस राज्यातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज दिला आहे.
पंजाबरावांनी देखील 15 16 आणि 17 जानेवारीला महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळणार असा अंदाज दिला आहे. डख यांनी आपल्या नवीन अंदाजात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे 17 जानेवारीपर्यंत राज्यात ढगाळ हवामान राहील असं सांगितलं.
तसेच त्यांनी चाळीसगाव व आजूबाजूच्या भागात कुठेतरी हलका पाऊस होईल आणि लातूर व सोलापूर या भागाकडे सुद्धा हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज यावेळी वर्तवला आहे. पण महाराष्ट्रात फार मोठा पाऊस काही पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाहीये असे देखील त्यांनी आपल्या या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी या भागात पुढील तीन दिवस फक्त आणि फक्त ढगाळ हवामानाची शक्यता आहे. राज्यात कुठेच मोठा पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये.
फक्त चाळीसगाव, लातूर व सोलापूर या भागाकडे थोडासा हलका पाऊस राहू शकतो असे पंजाबरावांनी सांगितले आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांची तूर हार्वेस्टिंग सुरू असेल त्यांनी तुरीची काढणी करून घ्यावी. ज्यांचा कांदा काढणी सुरू असेल त्यांनी कांदा काढणी करून घ्यावी. कांदा लागवडीची कामे सुरू असतील तर कांदा लागवड पूर्ण करावी.
कारण शेतकऱ्यांनी घाबरून जावे अशी परिस्थिती सध्या तरी नाही असे पंजाबरावांनी यावेळी म्हटले आहे. परंतु पंजाब रावांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी लागू शकते असेही आपल्या या अंदाजात स्पष्ट केले असून तेव्हा शेतकऱ्यांसाठी एक नवीन अंदाज जारी केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.