Panjabrao Dakh News : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर येत आहे. या नव्या हवामान अंदाजात पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे मात्र त्यानंतर राज्यातील हवामानात मोठा विलक्षण बदल पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्या शेतीमधील महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे. अशा परिस्थितीत आता आपण पंजाबरावांचा हा नवा हवामान अंदाज नेमका काय म्हणतोय या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाबरावांनी काय सांगितले ?
पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात दोन तीन आणि चार फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यातील अनेक विभागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.
31 जानेवारी 2025 अखेरपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील पण त्यानंतर राज्यातील हवामानात बिघाड होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी एक फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडे राहू शकते.
पण 2 फेब्रुवारी 2025 पासून राज्यातील हवामानात बिघाड होईल आणि अवकाळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे. यामुळे एक फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी तूर हरभरा कांदा काढणी पूर्ण करून घ्यावी. कारण की दोन तारखेनंतर राज्यात पाऊस होईल आणि या अवकाळी पावसाचा साहजिकच शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असे पंजाबरावांनी आपल्या नव्या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे. म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी हवामानाचा हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करावे.