स्पेशल

महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंताजनक ! यंदा मान्सून काळात ‘असं’ होणार, शेतकऱ्यांच मोठं नुकसान होईल; पंजाबराव डख यांचा नवीन मान्सून अंदाज

Published by
Ajay Patil

Panjabrao Dakh News : पंजाबराव डख यांनी नुकतीच मानसून 2023 बाबत मोठी माहिती दिली आहे. या मान्सून अंदाजामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. वास्तविक डखं यांनी वर्तवलेला हवामान अंदाज हा तंतोतंत खरा ठरत असल्याचे शेतकरी व्यक्त करत आहे. अशातच त्यांनी यावर्षी महाराष्ट्रातील काही भागात महापुराची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच सामान्य जनजीवन देखील विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.

महापुरामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून नुकसान होत आहे. मान्सून काळात अतिवृष्टीमुळे, अधिकच्या पावसामुळे महापूर येत आहे. यंदा देखील तशीच परिस्थिती तयार होणार असल्याचे मत पंजाब रावांनी व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीत आज आपण डख यांनी नेमक्या कोणत्या भागात महापूराची शक्यता वर्तवली आहे याबाबत जाणून घेणार आहोत तसेच मान्सून बाबत डक यांनी वर्तवलेला सविस्तर हवामान अंदाज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! आता महाराष्ट्रात NA टॅक्स लागणार नाही; महसूल मंत्री विखे पाटलांची मोठी घोषणा

कसा असेल मान्सून 2023?

यंदाच्या मान्सून बाबत वेगवेगळ्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदा पर्जन्यमान कमी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. या संस्थेने देशात दुष्काळ पडण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.

या आधी अमेरिकन हवामान विभागाने देखील भारतासह आशिया खंडातील काही देशात दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या दोन्ही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेच्या विपरीत भारतीय हवामान विभागाने यंदा चांगला मान्सून राहणार असल्याचे मत व्यक्त केल आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा

याशिवाय डखं यांनी देखील यावर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊसमान राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. डक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनच आगमन 8 जून 2023 ला होणार आहे. मान्सूनचे आगमन जरी आठ जूनला होणार असले तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून हा 22 जून पर्यंत पोहचेल.

22 जून पर्यंत राज्यात जवळपास सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. यानंतर 27 जून ते 30 जून या कालावधीमध्ये राज्यात खरीप हंगामातील पेरण्या होतील असे देखील मत त्यांनी व्यक्त केल आहे. याशिवाय यंदा 2022 प्रमाणे चांगला पाऊस राहणार असल्याचे त्यांनी सांगितले असून जूनच्या तुलनेत जुलैमध्ये आणि जुलैच्या तुलनेत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात अधिक पाऊस राहणार आहे.

हे पण वाचा :- मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ मेट्रोमार्ग प्रकल्पाबाबत झाला मोठा निर्णय; आता मुंबई ते ठाणे प्रवास लवकरच होणार सुसाट, पहा काय आहे निर्णय?

कुठं येणार महापूर?

यंदा 2022 प्रमाणे मान्सून काळात चांगला पाऊस होणार आहे. यामुळे याही वर्षी कृष्णा नदी काठावर महापूर येणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे कृष्णा नदीकाठी वसलेल्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांपासून कृष्णा नदीला महापूर येत असून यामुळे नदीकाठी वसलेले शेतकरी आणि सामान्य जनता त्रस्त झाली आहे. दरम्यान याही वर्षी कृष्णा नदी काठावर महापूर येणार असल्याने येथील जनतेला अधिक सजग आणि सतर्क राहावे लागणार आहे.

हे पण वाचा :- खुशखबर ! मुंबईहुन सुटणाऱ्या ‘या’ सुपरफास्ट ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड रेल्वे स्टेशनवर थांबा मिळणार; पहा…

Ajay Patil

Published by
Ajay Patil