Panjabrao Dakh Prediction : पंजाबराव डख यांनी 2023 च्या मान्सून बाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. अमेरिकन हवामान विभागाने यंदा भारताचा संपूर्ण आशिया खंडात दुष्काळाचे संकेत दिले आहेत. मात्र परभणीचे हवामान तज्ञ डख यांनी यंदा गेल्या वर्षी प्रमाणे चांगला मानसून राहील असा अंदाज बांधला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा ८ जूनला मान्सूनचा आगमन आपल्या महाराष्ट्रात होणार आहे.
तसेच 22 जून पर्यंत मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. जवळपास 27 ते 28 जून पर्यंत राज्यात सर्वत्र खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या होणार असल्याचा दावा देखील पंजाबरावांनी केला आहे. सोयाबीन या खरीप हंगामातील मुख्य पिकाची पेरणी जून महिन्याच्या अखेरपर्यंत होणार असून जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये अधिक पाऊस पडेल. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात अधिक पाऊस राहील असा अंदाज त्यांनी बांधला आहे.
हे पण वाचा :- छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी खुशखबर! ‘या’ मोठ्या शहरादरम्यान सुरू होणार विमानसेवा, केव्हा सुरु होणार विमानसेवा? पहा…
एवढंच नाही तर यावर्षी 26 ऑक्टोबरला प्रत्यक्षात थंडीची चाहूल जाणवेल म्हणजेच या कालावधीमध्ये महाराष्ट्रातून मान्सून निरोप घेईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. याशिवाय त्यांनी यंदा नोव्हेंबर मध्ये म्हणजेच दिवाळीमध्ये पावसाची शक्यता असल्याचे मत व्यक्त केला आहे. खरं पाहता शेतकऱ्यांमध्ये पंजाबरावांच्या हवामान अंदाजाविषयी कायमच मोठ्या चर्चा रंगतात. त्यांचा हवामान अंदाज म्हणजेच काळ्या दगडावरील पांढरी रेघ अस शेतकरी नमूद करतात.
पंजाबराव स्वतः देखील आपल्या हवामान अंदाजावर कायमच ठाम असतात आणि आपण सांगितलेला हवामान अंदाज कधीच चुकणार नाही असा दावा ते करतात. दरम्यान आज आपण पंजाबरावांनी सांगितलेल्या एका महत्त्वाच्या माहिती बाबत जाणून घेणार आहोत. वास्तविक पंजाबरावांनी पाऊस कसा येतो हे कसं ओळखायचं याबाबत मोठी माहिती दिली आहे तीच आज आपण जाणून घेणार आहोत.
पाऊस कसा येतो हे असं ओळखा : पंजाब डख
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, जर दिवस मावळताना सूर्याभोवती आभाळ तांबड्या कलरचे दिसलं की तेथून पुढे तीन दिवसानंतर हमखास पाऊस पडतो.
तसेच ते सांगतात की आपल्या घरातील लाईटवर किडे, पाकुळे आले की पुढच्या तीन दिवसात पावसासाठी पोषक हवामान तयार होते आणि हमखास पाऊस पडत असतो.
याशिवाय त्यांनी सांगितले की, मृग नक्षत्रामध्ये म्हणजेच जून महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या आसपास ज्यावेळी चिमण्या धुळीत अंघोळ करतात अशावेळी तेथून पुढच्या तीन दिवसात पावसाची शक्यता तयार होत असते.
तसेच जर आकाशातून विमान जात असताना त्याचा आवाज येत असेल तर समजायचं की तेथून पुढच्या तीन दिवसात पाऊस हमखास पडतो. त्यांच्या मते जेव्हा पावसाचे ढग वर येतात तेव्हाच विमानाचा आवाज येतो.
तसेच गावरान आंबा जर कमी प्रमाणात पिकला तर अशा वर्षी चांगला पाऊस राहतो.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘त्या’ प्राध्यापकांच्या वेतनवाढीचा प्रश्न लागला मार्गी, शासन निर्णय जारी; आता ‘इतकं’ वाढणार मानधन, पहा…..
याबाबत पुढे बोलताना डख यांनी नमूद केलं की, जून महिन्यामध्ये सूर्यावर तपकिरी कलर आला तर पुढील चार दिवसात 100% पाऊस हा पडत असतो.
ज्या वर्षी चिंचेच्या झाडाला अधिक चिंचा लागतात त्यावर्षी पावसाचे प्रमाण हे तुलनेने अधिक असल्याचे मत यावेळी डखं यांनी व्यक्त केल आहे.
तसेच सरड्याच्या बदलत्या रंगानुसार देखील पावसाचा अंदाज बांधता येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, जर सरडा आपल्या डोक्यावर लाल कलर तयार करत असेल तर अशावेळी समजायचं की पुढच्या चार दिवसात हमखास पाऊस पडेल.
याशिवाय घोरपड ज्याला इंडियन लिझार्ड म्हणून ओळखलं जातं हा प्राणी जेव्हा बिळाच्या बाहेर तोंड काढून बसतो तेव्हा तेथून पुढील चार दिवसात पावसाची शक्यता ही तयार होत असते.
हे पण वाचा :- शिक्षकांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शाळांना मिळणार 20% अनुदान, तब्बल 63 हजार शिक्षकांच्या वेतनात होणार वाढ