स्पेशल

Home Loan: घेतलेले होमलोन फेडले आता तुम्ही झालात निवांत? तर असे होत नाही! ‘या’ गोष्टींकडे दया लक्ष,नाहीतर होईल नाहक त्रास

Published by
Ajay Patil

Home Loan:- प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचे स्वप्न असते व हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असते. परंतु सध्या जमिनींचे वाढलेले दर पाहता प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य होत नाही. कारण प्रत्येकाकडेच रोख स्वरूपामध्ये इतका पैसा असेल असे होत नाही व बऱ्याच जणांचे स्वप्न हे स्वप्नच राहते.

परंतु आता बँकांच्या माध्यमातून घर खरेदीसाठी होमलोनचा पर्याय अगदी सुलभ करण्यात आल्याने ताबडतोब होमलोन मिळते व बरेच जण होमलोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात. कर्ज घेतले म्हणजे त्याची परतफेड ही आलीच व होमलोन घेतल्यानंतर त्या कर्जाची परतफेड देखील आपल्याला करावी लागते.

कालांतराने होम लोन आपण व्यवस्थित फेडतो व एक  निवांत झाल्याचा अनुभव किंवा कर्जातून  सुटका झाली याच्या आनंदात असतो. परंतु लोन पूर्ण झाले तरीदेखील तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते व याकरिता त्यांच्याकडून तुम्ही काही महत्त्वाची कागदपत्रे परत मागणे खूप गरजेचे असते

कारण बँक जेव्हा आपल्याला होमलोन देते तेव्हा अनेक कागदपत्रे आपल्याकडून घेत असते किंवा लिहून घेत असते. परंतु लोन पूर्ण फेडल्यानंतर आपण ते कागदपत्र बँकेकडून पुन्हा मागत नाही. त्यामुळे अशी कोणती कागदपत्रे किंवा कोणत्या गोष्टी आहेत की होम लोन संपल्यावर त्या तुम्ही करणे गरजेचे आहे यासंबंधीचीच माहिती आपण घेणार आहोत.

 होमलोन फेडल्यानंतर बँकेकडून ही कागदपत्रे घ्या

1- बँकेला दिलेले पोस्ट डेटेड चेक मागून घेणे जेव्हा आपण बँकेकडून कर्ज घेतो तेव्हा बँक आपल्याकडून काही चेक घेत असते व पुढील देय तारखेसह हे चेक बँकेने घेतलेले असतात. एखाद्या वेळेस जर आपला कर्जाचा हप्ता चुकला तर बँक त्या चेकचा वापर करून त्यांचे पैसे वसूल करते. हा ते चेक देण्यामागील उद्देश असतो. तुम्ही जर कर्ज पूर्णपणे फेडले तर तुम्हाला बँकेकडून हे चेक मागून घेणे गरजेचे असते.

2- नो ड्युज सर्टिफिकेट मागणे जेव्हा तुम्ही बँकेकडून घेतलेले लोन पूर्णपणे फेडता तेव्हा बँकेकडून तुम्ही तुमच्यावर कुठल्याही प्रकारची सदर लोनची थकबाकी नाही याचे प्रमाणपत्र मागणे खूप गरजेचे असते. तुम्ही हे प्रमाणपत्र घेतले नाही तर तुम्हाला काही वेळेस अडचणी देखील येऊ शकतात. कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेचे तुमच्याकडे एक रुपया देखील थकबाकी घेणे नाही असं स्वरूपाचे प्रमाणपत्र मागून घेणे गरजेचे असते.

3- मालमत्तेवरून बँकेचे धारणाधिकार काढणे जेव्हा बँक आपल्याला होमलोन देते तेव्हा त्या कर्जाची परतफेड जर आपण करू शकलो नाही तर बँक आपल्या घराचा ताबा घेण्याचे अधिकार स्वतःकडे घेते. त्यामुळे जेव्हा तुमचे कर्ज संपेल तेव्हा तो अधिकार तुम्ही बँकेकडून काढणे किंवा काढून घेणे गरजेचे असते.

काही परिस्थितीमध्ये बँक हा अधिकार तुम्हाला भविष्यात घर विकण्यापासून रोखू शकते. त्यामुळे तुमचे होमलोन भेटल्यानंतर हे काम करणे खूप गरजेचे आहे व याकरिता तुम्हाला बँक अधिकाऱ्यांसह निबंधक कार्यालयामध्ये जावे लागते.

4- अपडेटेड गैरभार प्रमाणपत्र घेणे  बँकेमध्ये कायदेशीर सल्लागार असतात व ते तांत्रिक तपशील समजून घेतल्यानंतर अहवाल तयार करतात. या सगळ्या कागदपत्रांमध्ये तुमच्या घराचा संबंधित असलेले सर्व आर्थिक व्यवहारांचा तपशील नमूद केलेला असतो.

उदाहरणच घ्यायचे झाले तर यामध्ये सदर मालमत्ता कधी घेतली होती व कोणाकडून घेतली तसेच किती किमतीला विकली गेली.  घेतलेले कर्ज कधी घेतले व किती रक्कम घेतली होती? इत्यादी संबंधितची माहिती अहवालात नमूद केलेली असते व या अहवालात मालकाने चूक केली तर बँक सदर मालमत्ता किंवा जमीन विकण्याच्या स्थितीमध्ये आहे का याचा देखील उल्लेख केलेला असतो.

त्यामुळे गृहकर्ज जेव्हा तुम्ही फेडाल तेव्हा बँकेकडून या संबंधीचे अपडेटेड प्रमाणपत्र मागून घेणे आवश्यक असते. कारण जेव्हा तुम्ही अपडेटेड प्रमाणपत्र घेता तेव्हा तुमचे कर्ज बंद केल्याची माहिती देखील यामध्ये लिहिलेली असते.

5- कर्ज परतफेडीचे स्टेटमेंट मागणे तसेच तुम्ही कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेच्या माध्यमातून तुमचे कर्ज परतफेडीचे संपूर्ण स्टेटमेंट मागून घेणे गरजेचे असते व ज्यामध्ये तुमच्या पहिल्याच पेमेंट पासून शेवटच्या पेमेंट पर्यंतचा तपशील तुम्हाला कळतो.

6- क्रेडिट रिपोर्ट अपडेट करून घेणे तुम्ही होमलोन फेडल्यानंतर अनेक वेळा बँक कर्ज बंद झाल्याची माहिती क्रेडिट कंपनीला पुरवत नाहीत. बऱ्याचदा होम लोन फेडल्यानंतर देखील तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये ते चालू असल्याचे दिसून येते व त्यामुळे याचा नकारात्मक परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होतो. त्यामुळे तुमचे कर्ज फिटल्यानंतर क्रेडिट रिपोर्ट अपडेट करून घेणे खूप गरजेचे असते.

Ajay Patil