स्पेशल

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना झाला आहे ते व्यक्ती राजकारणात होतात यशस्वी! वाचा तुमची आहे का यात जन्मतारीख?

Published by
Ajay Patil

Numerology:- अंकशास्त्र हे एक महत्त्वाचे शास्त्र असून यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ज्या तारखेला झालेला असतो त्या तारखेवरून त्या व्यक्तीचे भविष्य, संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसेच स्वभाव आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये ते व्यक्ती यशस्वी होते किंवा होऊ शकते त्याबद्दल महत्त्वाची माहिती दिलेली असते.

अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेवरून मुलांक काढला जातो व या मुलांकावरून कोणत्याही व्यक्तीचे भविष्य वर्तवले जाते. मुलांक हा जन्मतारखेतील दोन अंकांच्या बेरजेवरनं काढला जातो. समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म जर 31 किंवा 22 तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तींचा मुलांक हा चार येतो.

त्याप्रमाणे जर आपण अंकशास्त्रानुसार बघितले तर कोणत्याही महिन्याच्या 22, 31 तसेच 13 किंवा चार यापैकी कोणत्याही एका तारखेला जर जन्म झालेला असेल तर त्या व्यक्तींचा मुलांक हा चार असतो व अंकशास्त्रानुसार हा मुलांक असलेल्या व्यक्तींवर प्रामुख्याने सूर्य आणि गुरुचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

चार मुलांक असलेल्या व्यक्ती हे आयुष्यामध्ये कसे असतात किंवा त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते? याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण अंकशास्त्रानुसार घेऊ शकतो.

आयुष्यात चार मुलांक असलेल्या व्यक्ती कशा असतात?
ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार किंवा 22 किंवा 13 किंवा 31 या तारखांना झालेला असतो त्यांचा मूलांक 4 असतो. अंकशास्त्रानुसार बघितले तर या व्यक्तींवर सूर्य आणि गुरूचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. हे व्यक्ती प्रामुख्याने…..

1- मनमिळाऊ स्वभावाचे असतात- अंकशास्त्रानुसार बघितले तर चार मुलांक असलेले व्यक्ती हे स्वभावाने खूपच मनमिळावू असतात व या स्वभावामुळे मित्रपरिवार खूप मोठा असतो. या व्यक्तींवर मित्रांच्या संगतीचा खूप मोठा प्रभाव पडतो व त्यामुळे मित्रांपासून त्यांना फायदा देखील होतो आणि कधी तोटा देखील संभवतो.

2- राजकारणामध्ये आवड असते- ज्या व्यक्तींचा मूल्यांक हा चार असतो त्या लोकांवर गुरु आणि सूर्याचा प्रभाव असतो व त्यामुळे चार मुलांक असलेल्या व्यक्तींना राजकारणामध्ये खूपच आवड असते व त्यांना राजकारणाची समज देखील उत्तम पद्धतीची असते. या तारखांना जन्म झालेल्या व्यक्तीमध्ये नेतृत्व गुण विशेष प्रकारचे असतात व त्यामुळे ते राजकीय क्षेत्रामध्ये खूप उत्तम काम करू शकतात.

3- मनाप्रमाणे जगायला आवडते- चार मुलांक असलेले व्यक्ती हे त्यांना आवडेल तसे आणि त्यांच्या मनाला पटेल त्या पद्धतीचे जीवन जगणारे असतात. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघितले तर हे खूपच हुशार असतात. परंतु त्यांच्यातील एक दुर्गुण जर बघितला तर ते कुठल्याही पद्धतीची गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत व त्यामुळे बऱ्याचदा त्यांनी ध्येय ठरवले तरी त्यावर ते फोकस करू शकत नाही.

4- मित्र विश्वासघात करतात- ज्या व्यक्तींचा मुलांक चार आहे अशी व्यक्ती कोणत्याही लोकांबरोबर सहज मिसळतात व कुणाला देखील पटकन मित्र बनवतात. तसेच मित्र परिवारावर जीवापाड प्रेम करणारे हे व्यक्ती असतात. परंतु अनेकदा मित्रांकडून त्यांचा विश्वासघात होतो.

5- जीवनात राजकीय नेते बनतात- अंकशास्त्रानुसार बघितले तर चार मुलांक असलेल्या व्यक्ती या राजकारणामध्ये यशस्वी ठरतात. मुळात त्यांना राजकारणात खूप मोठी आवड असते.

त्यामुळे ते भविष्यात राजकीय नेते देखील बनतात. समाजामध्ये देखील त्यांचे चांगले वर्चस्व असते व स्वभाव मनमिळावू असल्यामुळे समाजामध्ये देखील ते लोकांचे एक आवडते व्यक्ती म्हणून वावरतात व लोकांचे भरपूर प्रेम त्यांना मिळते.

( टीप- वरील माहिती वाचकांसाठी फक्त माहिती म्हणून सादर करण्यात आलेली आहे. या माहितीचे अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचे समर्थन अथवा याविषयी कुठलाही दावा करत नाही.)

Ajay Patil

Published by
Ajay Patil