स्पेशल

Personal Loan: पैशांची इमर्जन्सी आली तर नका करू काळजी! ‘ही’ बँक देईल तुम्हाला काही मिनिटात 8 लाख रुपयापर्यंत लोन, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Personal Loan:- जीवनामध्ये केव्हा पैशांची अचानकपणे गरज भासेल याचा कुठल्याही प्रकारे भरोसा नसतो. अचानकपणे आपले किंवा कुटुंबातील सदस्यांची काहीतरी हॉस्पिटलची समस्या उद्भवते किंवा घरात लग्नकार्य किंवा मुलांच्या शिक्षणाची फीस वगैरे भरण्यासाठी पैसा लागतो व जेवढा पैसा आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे राहीलच असे होत नाही.

अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशांची गरज भागवण्यासाठी साहजिकच कर्जाचा पर्याय निवडला जातो व यामध्ये बरेच व्यक्ती पर्सनल लोन म्हणजे वैयक्तिक कर्जाला प्राधान्य देतात.

अशाच प्रकारे तुम्हाला देखील आपत्कालीन पैशांची गरज उद्भवली असेल व तुम्हाला पर्सनल लोनसाठी अर्ज करायचा असेल तर या लेखामध्ये आपण पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी बँकेकडून देण्यात येणाऱ्या कमी व्याजदरातील पर्सनल लोन विषयी माहिती घेणार आहोत.

 काय आहे पंजाब नॅशनल बँकेच्या पर्सनल लोन साठीची पात्रता?

1- यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मासिक उत्पन्न कमीत कमी 30 हजार रुपये असणे गरजेचे आहे.

2- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा स्वतःचा व्यवसाय असावा किंवा तो नोकरीला असावा.

3- इतर कोणत्याही वित्तीय कंपनीकडून आधी कर्ज घेतलेले नसावे.

4- वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय 21 ते 58 वर्षाच्या दरम्यान असावे.

5- सगळ्यात महत्वाचे म्हणजे अर्जदाराचा सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असावा आणि संबंधित व्यक्तीवर एखादी कायदेशीर प्रक्रिया किंवा कायद्याने तो दिवाळखोर नसावा.

 पीएनबी पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

तुम्हाला देखील पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, मागील तीन वर्षाचे आयकर विवरण आणि मागील तीन महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट असणे आवश्यक आहे.

 पीएनबी बँक पर्सनल लोनसाठी अर्ज कसा करावा?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमचे या बँकेच्या कोणत्याही अधिकृत शाखेत खाते असणे आवश्यक आहे. जर तुमचे बँकेत खाते नसले तरी देखील तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकतात. याकरिता तुम्हाला पीएनबीच्या मोबाईल ॲप द्वारे किंवा बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करता येतो.

यामध्ये पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेचे मोबाईल ॲप द्वारे किंवा बँकेच्या वेबसाईटवर ज्या प्रकारे अर्जाची प्रक्रिया नमूद केलेली असेल त्यानुसार तुम्हाला अर्ज करावा लागतो व तो अर्ज केल्यावर माहिती बरोबर आढळल्यास बँक पुढील प्रक्रिया करून तुमच्या खात्यात कर्जाचे पैसे ट्रान्सफर करते.

 किती आहे पीएनबी

बँकेच्या कर्जाचा व्याजदर

साधारणपणे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा 8.95% पासून त्याचा टक्क्यांपर्यंत आहे व या माध्यमातून तुम्ही 50 हजार पासून ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकतात.

याकरता परतफेडीचा कालावधी साठ महिन्याचा असतो व महत्त्वाचे म्हणजे याच्यावर कुठल्याही स्वरूपाचे प्री पेमेंट शुल्क आकारले जात नाही व प्रोसेसिंग शुल्क हे एकूण कर्जाच्या रकमेच्या 1.80 टक्के पर्यंत असते.

Ajay Patil