Personality Test:- जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्त्व माहीत करून घ्यायचे असते तेव्हा लगेचच आपण या गोष्टी माहित करू शकत नाही. कारण पहिल्या भेटीतच आपण एखादा व्यक्तीचा स्वभाव कसा आहे किंवा त्याचे व्यक्तिमत्त्व कसे आहे? त्याच्या स्वभावामध्ये काहीतरी गुणदोष आहेत का? इत्यादी गोष्टी ओळखणे पहिल्या भेटीत तरी अशक्य असते.
याकरिता आपल्याला काही कालावधी जाऊ द्यावा लागतो किंवा त्या व्यक्तीबरोबर काही काळ व्यतीत करावा लागतो व तेव्हाच कुठे त्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या स्वभावाबद्दल आपल्याला माहिती होत असते.
परंतु जर आपण बघितले तर पर्सनॅलिटी टेस्टच्या माध्यमातून व्यक्तीच्या शारीरिक रचना म्हणजेच त्याच्या नाकाची रचना किंवा बोटांची रचना इत्यादी वरून देखील व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याच्या स्वभावातील गुणदोष आपल्याला ओळखता येतात.
या अनुषंगाने जर आपण बघितले तर व्यक्तीच्या हाताचा अंगठ्याचा आकार देखील आपल्याला संबंधित व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याचे व्यक्तिमत्त्व इत्यादी बद्दल माहिती देत असतो. त्यामुळे अंगठ्याच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव कसा आहे व स्वभावातील गुणदोष कसे ओळखावे? याबद्दलची माहिती थोडक्यात घेणार आहोत.
व्यक्तीच्या अंगठ्याच्या आकारावर ओळखा व्यक्तीचा स्वभाव
1- सरळ अंगठा- आपल्याला माहित आहे की काही व्यक्तींच्या अंगठा हा अगदी सरळ असतो. म्हणजेच अंगठ्यामध्ये जरा देखील वाक नसतो. असा जर एखाद्या व्यक्तीचा अंगठा असेल तर ते व्यक्ती स्वभावाने सरळ साधे असतात व त्यांच्यात प्रचंड प्रमाणात आत्मविश्वास असतो. इतकेच नाहीतर ते जीवन जगत असताना अतिशय प्रामाणिक व निष्ठावान असे जीवन जगतात.
2- मागच्या बाजूला झुकलेला अंगठा- एखाद्या व्यक्तीचा अंगठा जर मागच्या साईटला म्हणजेच मागच्या बाजूला झुकलेला असेल व अत्यंत लवचिक स्वरूपाचा असेल तर असे लोक कोणत्याही परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेतात व परिस्थितीशी मिळते जुळते घेतात. परंतु त्यांच्यातील दुर्गुण एक असा असतो की ते खूप हलक्या कानाचे असतात. म्हणजेच कोणी काही सांगितले तरी त्यावर पटकन विश्वास ठेवतात.
3- कठोर अंगठा- ज्या व्यक्तींचा अंगठा कठोर असतो असे लोक स्वभावाने देखील खूप कठोर असतात. परंतु समाजात जगताना ते स्पष्ट वक्तेपणाने राहतात व त्यांचे मन देखील अतिशय स्वच्छ असते. परंतु त्यांच्यात असलेला स्पष्ट वक्तेपणामुळे कधी कधी काही लोकांचे मन नकळत त्यांच्याकडून दुखावले जाते.
4- मुलायम अंगठा- काही लोकांचा अंगठा हा खूपच नरम म्हणजेच मुलायम असतो. असा अंगठा असणारे लोक हे आयुष्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात. आयुष्यामध्ये त्यांची नेहमी प्रगती होत असते व ते नेहमी कुठलाही क्षेत्रात यशस्वी ठरतात.
5- मोठा अंगठा- काही लोकांची बोटे हे लांबलचक असतात व अशी लोक दिसायला देखील आकर्षक असतात. त्यांची बुद्धी अतिशय कुशाग्र असते व त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतात.
6- छोटा अंगठा- ज्या व्यक्तींचा अंगठा लहान असतो किंवा छोटा असतो असे लोक प्रामुख्याने कला क्षेत्राशी निगडित असतात. या लोकांचा मित्रपरिवार देखील खूप मोठ्या प्रमाणावर असतो व त्यांच्याकडे मित्रांची कमतरताच नसते. असे लोक प्रामुख्याने कलाक्षेत्रामध्ये खूप यशस्वी असतात.
( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली असून याविषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही अथवा समर्थन करत नाही.)