स्पेशल

Personality Test: व्यक्तीच्या झोपेच्या पद्धतीवरून ओळखता येते व्यक्तीचे व्यक्तिमत्व; झोपेच्या पद्धतीवरून ओळखा व्यक्तीमध्ये असलेले गुण

Published by
Ajay Patil

Personality Test:- समाजामध्ये आपल्याला जे काही व्यक्ती भेटत असतात त्यांचे प्रत्येकाचे स्वभाव तसेच वागण्या बोलण्याची पद्धत इत्यादीमध्ये वेगळेपण दिसून येते. व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या बोलण्याची पद्धत यावरून त्यांचा लोकांशी कशा प्रकारे संपर्क असेल किंवा कशाप्रकारे त्याचे संबंध असतील हे आपल्याला कळून येते.

साधारणपणे व्यक्तीच्या बोलण्यातून किंवा स्वभावातून समोरचा व्यक्ती कसा आहे? त्याची वागणूक कशी असू शकते किंवा कशी असेल? हे आपल्याला कळत असते. परंतु या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत की त्यावरून देखील आपल्याला समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जाणून घ्यायला मदत होते.

यामध्ये जर आपण झोपण्याची पद्धत पाहिली तर यामध्ये देखील बरेच व्यक्तींच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. झोपण्याच्या पद्धतीच्या माध्यमातून देखील आपल्याला समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असेल किंवा कसे असू शकते याची माहिती करून घेता येते.

 झोपण्याच्या पद्धतीवरून ओळखा व्यक्तीचे व्यक्तिमत्व

1- पाठीवर झोपण्याची सवय बऱ्याच व्यक्तींना झोपताना ते पाठीवर झोपण्याची सवय असते. अशी सवय असलेल्या व्यक्तींना लोकांमध्ये कायम आकर्षणाचे केंद्र बनवून राहिला आवडते. म्हणजे कायम लोकांच्या नजरेत किंवा लोकांच्या मनात राहिले पाहिजे अशा पद्धतीचा या लोकांचा प्रयत्न असतो. तसेच ज्या गोष्टींमध्ये त्यांचे समाधान होत नाही अशा गोष्टींमध्ये ते विनाकारण अडकून पडत नाही.

2- एका बाजूने झोपण्याची सवय काही लोकांना एका बाजूला झोपण्याची सवय असते. मुळात असे लोक खूप शांत असतात व ते विश्वसनीय देखील असतात. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांच्यावर सहजपणे विश्वास ठेवू शकतात

तसेच त्यांचा सहज स्वभाव असल्यामुळे त्यांना लोकांना भेटायला किंवा लोकांमध्ये मिसळायला देखील आवडते. भूतकाळामध्ये जर एखादी वाईट गोष्ट घडली असेल तर अशा गोष्टींबद्दल त्यांना पश्चाताप होत नाही आणि त्यांना भविष्याची देखील चिंता किंवा भीती वाटत नाही.

3- पोटाशी हातपाय दुमडून झोपण्याची सवय काही लोकांना कुरळे म्हणजेच हातपाय एकत्र करून झोपण्याची सवय असते. असे व्यक्ती हे त्यांच्या आजूबाजूला कायम संरक्षणात्मक वातावरण तयार करत असतात आणि असेच वातावरण त्यांना हवे असते.

दुसऱ्यांच्या इच्छेची ते खूप काळजी घेतात व नात्यांमध्ये देखील सुरक्षितता राहावी या दृष्टिकोनातून ते वागण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे झोपणाऱ्या व्यक्तींना संसाराच्या ज्या काही समस्या असतात त्यापासून दूर राहायचे असते.

4- पोटावर झोपण्याची सवय बऱ्याच व्यक्तींना पोटावर झोपायला आवडते व असे व्यक्ती हे जास्त करून कोणाशी भांडण किंवा वाद घालत नाहीत. तसेच लोकांशी देखील ते चांगले जोडले जातात व एकमेकांमध्ये आपुलकीची भावना अनुभवतात. विशेष म्हणजे अशा व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर आपुलकीची भावना असते.

Ajay Patil