Personality Test:- साधारणपणे समाजामध्ये आपल्याला अनेक स्वभावाचे तसेच वागण्या बोलण्याची वेगवेगळी तऱ्हा असलेले लोक भेटतात. प्रत्येकाचे स्वभाव तसेच वागणे बोलणे यामध्ये आपल्याला बऱ्याचदा फरक आढळून येतो. इतकेच नाही तर व्यक्तीच्या दररोजच्या ज्या काही सवयी असतात त्यामध्ये देखील आपल्याला बदल दिसतो.
मग ते बोलण्याची पद्धत असो किंवा चालण्याची लय किंवा एकंदरीत शारीरिक रचना या प्रत्येक गोष्टीत आपल्याला वेगळेपण दिसते. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला भेटला तर समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे आहे हे आपल्याला बऱ्याचदा समजत नाही.
परंतु तुम्ही अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत त्या पाहून किंवा त्यांचे निरीक्षण करून तुम्ही संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचा अंदाज लावू शकता.आता प्रत्येकाच्या हातात फोन आहे व या फोनच्या साह्याने देखील व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावू शकतो.
म्हणजे समोरचा व्यक्ती मोबाईल कसा हाताळतो किंवा त्या व्यक्तीची मोबाईल हातात पकडण्याची सवय कशी आहे यावरून देखील तुम्ही त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखू शकतात.
फोन हातात पकडण्याच्या पद्धतीवरून ओळखा व्यक्तीचे व्यक्तिमत्व
1- एका हातात मोबाईल पकडून ऑपरेट करणे– जेव्हा एखादा व्यक्ती मोबाईल वापरतो तेव्हा तो एका हातामध्येच पकडतो व त्याच हाताच्या अंगठ्याने त्या मोबाईलवर कुठल्याही पद्धतीचे काम करू शकतो. या पद्धतीने मोबाईल हाताळणारे व्यक्ती हे जीवनामध्ये खूप आत्मविश्वासू असतात
व आशावादी देखील असतात. जिवनामध्ये वेगात प्रगती व्हावी अशा प्रकारची इच्छा बाळगून असतात. विशेष म्हणजे असे व्यक्ती हे कुठल्याही समस्येला किंवा संकटांना न घाबरता त्यावर प्रचंड मेहनत करून यश मिळवतात.
2- मोबाईल पकडण्यासाठी दोन्ही हातांचा वापर– काही व्यक्ती तुम्ही पाहिले असतील की त्यांना दोन्ही हातांनी मोबाईल पकडण्याचे सवय असते व एका कुठल्याही हाताच्या अंगठ्याने ते मोबाईल ऑपरेट करत असतात. अशा प्रकारच्या व्यक्ती या प्रत्येक गोष्टीत खूप सावध असतात.
म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर कुठल्याही प्रकारचा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर त्या अगोदर त्या बाबतीत असलेले सर्व प्रकारचे संभाव्य धोके तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टींचा सारासार विचार करूनच निर्णय घेतात.
साध्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे कुठलेही गोष्ट करताना दहा वेळा विचार करतात. तसेच असे व्यक्ती हे सहजासहजी कोणावर विश्वास ठेवत नाहीत. अशा व्यक्तींमध्ये सहानुभूती तसेच बुद्धिमानता असे महत्त्वपूर्ण गुण देखील आपल्याला बघायला मिळतात.
3- मोबाईल दोन्ही हाताने पकडणे आणि ऑपरेट करण्यासाठी दोन्ही अंगठ्याचा वापर करणारे– बऱ्याच व्यक्तींना दोन्ही हातांनी मोबाईल पकडण्याची सवय असते व दोन्ही अंगठ्याचा वापर हा मोबाईल वर काम करण्यासाठी करताना आपल्याला दिसून येतात.
अशी सवय असलेली व्यक्ती हे जीवनामध्ये प्रचंड हुशार असतातच परंतु उत्साही देखील असतात. तसेच जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीत आनंदी राहायचा त्यांचा स्वभाव असतो व हे लोक स्वभावाने भोळे व निरागस असतात.
4- एका हाताने मोबाईल पकडून दुसऱ्या हाताच्या बोटाने मोबाईल ऑपरेट करणे– बरेच व्यक्ती एका हाताने मोबाईल पकडतात व दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने किंवा बोटाने तो मोबाईल ऑपरेट करत असतात. अशा प्रकारचे व्यक्ती स्वभावाने खूपच साधे आणि सरळ असतात. परंतु जीवनामध्ये अनेक धाडसी कामे करण्यामध्ये त्यांना विशेष मजा वाटते. तसेच कल्पनाशक्तीच्या दृष्टिकोनातून देखील हे खूप पुढे असतात.