Petrol Diesel Rate : सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि याच शेवटच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्यांनी 2024 सालच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर रोजी सर्वसामान्यांना भेट दिली आहे.
आज यूपीसह देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमती घसरत आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
अशा परिस्थितीत आता आपण देशातील कोणत्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, यूपीच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात पेट्रोल 16 पैसे स्वस्त दराने 94.71 रुपये प्रति लिटर विकले जात आहे.
तर डिझेल 20 पैशांनी घसरून 87.81 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. गाझियाबादमध्ये आज पेट्रोल 12 पैशांनी घसरले असून ते 94.58 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 14 पैशांनी घसरून 87.67 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज पेट्रोलचा दर 17 पैशांनी घसरून 94.52 रुपये प्रति लीटर झाला, तर डिझेल 20 पैशांनी घसरून 87.61 रुपये प्रति लीटर झाला. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये पेट्रोल १४ पैशांनी स्वस्त होऊन ९५.११ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १३ पैशांनी ८७.९७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कशा आहेत?
दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.