अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवे विक्रम नोंदवित आहेत. देशातील बहुतेक शहरांमध्ये सामान्य पेट्रोल 90 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त विकले जात आहे.
त्याचवेळी राजस्थानमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी 100 पेक्षा जास्त रुपये द्यावे लागतील. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 35 ते 38 पैसे महाग झाले आहेत. यासह दिल्लीत पेट्रोल 90.93 रुपये तर डिझेल 81.32 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
दुसरीकडे, जगात असे अनेक देश आहेत जिथे पेट्रोल इंधनाची किंमत भारताच्या तुलनेत कित्येक पटीने कमी आहे. काही देशांमध्ये पेट्रोलची किंमत भारतीय चलनात प्रतिलिटर 10 रुपयांपेक्षा कमी आहे.