Pharma Stock To Buy : अर्थसंकल्पाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. आगामी केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी, 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला जाणार आहे. या बजेटमधून शेअर बाजाराला मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारातील तज्ञ अनिल सिंघवी यांनी फार्मा दिग्गज Cipla शेअर्सबाबतीत मोठा सल्ला दिला आहे.
त्यांनी फार्मा सेक्टर मधील हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. मंडळी, सध्या हा स्टॉक 1425 रुपयाच्या श्रेणीत व्यापार करीत आहे. पण, या स्टॉकमध्ये पुढील 1-3 वर्षासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच प्रत्येक 10% घसरणीवर SIP करण्याचा देखील सल्ला त्यांनी दिलाय. दरम्यान आता आपण या स्टॉक साठी नेमकी काय टारगेट प्राईज ठेवण्यात आली आहे याची माहिती पाहूयात.
सिप्लाच्या शेअर साठी स्टॉक मार्केट मधील विश्लेषकांनी 1800 रुपयांची पहिली टार्गेट प्राईज आणि 1900 रुपयांची दुसरी टार्गेट प्राईज दिली आहे. जे की पुढील १ वर्षासाठी आहे. हे लक्ष्य साध्य केल्यानंतर, या स्टॉक साठी पुढील टार्गेट प्राईज दिली जाणार आहे. ही एक लार्जेकॅप फार्मा कंपनी आहे ज्याची मार्केट कॅप 1.15 लाख कोटी रुपयांची आहे. या फार्मा स्टॉकसाठी, 52 आठवड्याचा उच्चांक 1702 रुपये आणि निचाँक 1312 रुपये आहे.
या स्टॉक बाबत स्टॉक मार्केट विश्लेषकांनी असे म्हटलंय की, वाढीसंदर्भात व्यवस्थापनाने जारी केलेले निवेदन मजबूत आहे. कंपनीचे Q3 परिणाम देखील उत्कृष्ट आहेत. कंपनीकडे पुरेशी रोकड आहे आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित केले आहे. शेअर बाजारातील तज्ञ अनिल सिंघवी म्हणालेत की सिप्ला प्रामुख्याने जेनेरिक औषध बनवते.
आता हे कॉम्प्लेक्स जेनेरिक औषधाच्या दिशेने पुढे सरकत आहे. पुढील 2-3 वर्षात कंपनी बरेच सारे प्रॉडक्ट लाँच करणार अशी अपेक्षा आहे जी कंपनीच्या वाढीस बळकटी देईल. एकूणच फार्मा क्षेत्रासाठी सर्व काही सध्या सकारात्मक आहे. बाजाराचा मूड चांगला नाही.
अशा परिस्थितीत, हाय रिस्क असणारे मिडकॅप फार्मा कंपनीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सिप्ला सारख्या लार्जेकॅप फार्मा स्टॉकवर लक्ष केंद्रित करणे चांगले होईल, ज्यात जोखीम मर्यादित आहे. तसेच हा स्टॉक सध्या कामगिरीखाली आहे. Q3 निकालाबाबत बोलायचं झाल्यास कंपनीचे ऑपरेशनल उत्पन्न 7% वाढीसह 7073 कोटी राहिले.
EBITDA मध्ये 16% वाढ नोंदविली गेली, जे की 1989 कोटी राहिले. EBITDA मार्जिन 28.1% होते जे आतापर्यंतचे सर्वोच्च आहे. 50% वाढीसह, 1571 कोटींचा प्रॉफिट आणि प्रॉफिट मार्जिन 22.2% होता. कंपनीकडे सध्या 8,947 कोटी रुपयांची रोकड आहे.