Top CNG Car In India:- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यातल्या त्यात सीएनजी कार बघितल्या तर या इतर कारपेक्षा जास्त महाग असल्याचे म्हटले जाते.
परंतु भारतामध्ये अशा काही सीएनजी कार आहेत ज्या पेट्रोल आणि डिझेल कार पेक्षा खूपच जास्त महाग आहेत असे नाही. तसेच त्यांची रनिंग कॉस्ट आणि मेंटेनन्स देखील कमीत कमी असतो. विशेष म्हणजे या सीएनजी कार बजेट कार म्हणून देखील ओळखल्या जातात व तुम्ही तुमच्या आर्थिक बजेटमध्ये त्यांना खरेदी करू शकतात.
सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढताना दिसत आहे. अगदी त्याच पद्धतीने सीएनजी वाहनांकडे देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. तुम्हाला देखील जर चांगली वैशिष्ट्य असलेली व बजेट मधील सीएनजी कार घ्यायची असेल तर आपण काही सीएनजी कारची माहिती थोडक्यात बघणार आहोत.
या आहेत भारतातील टॉप सीएनजी कार
1- टाटा नेक्सन सीएनजी- टाटा मोटरच्या माध्यमातून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये टाटा नेक्सॉनचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले होते. या सीएनजी कारची एक्स शोरूम किंमत आठ लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 14 लाख 59 हजार रुपये पर्यंत जाते.
2- मारुती स्विफ्ट सीएनजी- मारुती सुझुकी स्विफ्ट ही देखील देशातील एक प्रसिद्ध अशी कार असून मारुती सुझुकी कंपनीच्या विविध कारमध्ये या कारची विक्री सर्वात जास्त होते. ही हॅचबॅक कार असून तिचे तीन सीएनजी प्रकार आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत आठ लाख वीस हजार रुपयांपासून सुरू होते तर नऊ लाख वीस हजार रुपये पर्यंत जाते.
3- टोयोटा अर्बन क्रूजर टायझर सीएनजी- टोयोटा कंपनीची ही एक लोकप्रिय कार असून टोयोटाच्या या लोकप्रिय असलेल्या क्रॉसओवर अर्बन क्रुझर टायझरची एक्स शोरूम किंमत आठ लाख 71 हजार रुपयांपर्यंत आहे.ही देखिल एक उत्तम अशी सीएनजी कार आहे.
4- ह्युंदाई एक्सेटर सीएनजी- ह्युंदाई मोटर इंडियाची ही एक लोकप्रिय अशी एसयूव्ही कार असून या ह्युंदाई एक्सेटर सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत आठ लाख 43 हजार रुपयांपासून सुरू होते तर नऊ लाख 38 हजार रुपये पर्यंत जाते.
5- मारुती सुझुकी बलेनो सीएनजी- मारुती सुझुकी कंपनीचे प्रीमियम हॅचबॅक असलेल्या बलेनो देखील एक उत्तम सीएनजी कार असून बलेनोच्या सीएनजी व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत आठ लाख 40 हजार रुपयांपासून सुरू होते तर नऊ लाख 33 हजार रुपये पर्यंत जाते.
6- टाटा पंच सीएनजी- टाटा पंच ही टाटा मोटर्स कंपनीची सर्वात जास्त विकली जाणारी कार असून या कारचे सीएनजी व्हेरियंटची देखील विक्री चांगली आहे. टाटा पंच सीएनजी कारची एक्स शोरूम किंमत सात लाख 23 हजार रुपयांपासून सुरू होते तर दहा लाख पाच हजार रुपये पर्यंत जाते.