स्पेशल

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेत करण्यात आला महत्त्वाचा बदल! आता मिळेल ‘या’ लोकांना देखील घर

Published by
Ajay Patil

PM Awas Yojana:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी अनेक महत्वाच्या योजना राबवल्या जात असून या योजनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचवावे याकरिता या योजनांचा मोठा हातभार लागतो.

तसेच जर आपण मानवाच्या मूलभूत गरजा पाहिल्या तर यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरजा खूप महत्त्वाच्या असतात व यातील निवारा म्हणजेच स्वतःच्या हक्काचे घर असणे खूप गरजेचे असते. त्यामुळे देशातील ग्रामीण,शहरी भागातील नागरिकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर असावे याकरिता गेल्या काही वर्षापासून पंतप्रधान आवास योजना राबवली जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी नागरिकांना आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेत घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळवण्याकरिता किंवा या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी काही अटी व नियम असून याअंतर्गतच या योजनेचा लाभ दिला जातो.

अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या नियमामध्ये सरकारने बदल केला असून त्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

 पंतप्रधान आवास योजनेत या नियमामुळे अर्जदार होत असत अपात्र

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ची सुरुवात साधारणपणे 2015 मध्ये करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येते.

यामध्ये अगोदर असा एक नियम होता की,यामध्ये जर अर्जदाराचे मासिक उत्पन्न 10000 रुपये असेल व त्याच्या घरी लँडलाईन फोन किंवा दुचाकी, असेल तर अशांना लाभ मिळत नव्हता किंवा अशा नागरिकांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येत होता. परंतु आता यामध्ये बदल करण्यात आला

असून आता बदललेल्या नियमानुसार बघितले तर एखाद्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये असेल तसेच अर्जदाराच्या घरी लँडलाईन फोन असेल किंवा संबंधित अर्जदाराच्या घरी दुचाकी, फ्रिज असले तरी त्याचा अर्ज आता पात्र म्हणजेच ग्राह्य धरला जाणार आहे.

अशा व्यक्तींचा अर्ज आता बाद ठरवला जाणार नाही व अशा व्यक्तींना आता पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे व यामुळे आता या योजनेची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे.

 पंतप्रधान आवास योजनेतून किती केली जाते आर्थिक मदत?

सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी लाभार्थ्याला एकूण एक लाख वीस हजार रुपये दिले जातात व ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये विभागून दिले जाते. देण्यात येणाऱ्या रकमेचे स्वरूप पाहिले तर पहिल्या टप्प्यामध्ये 70 हजार रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 40 व तिसरा टप्प्यात दहा हजार रुपये दिले जातात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil