स्पेशल

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! पीएम आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ‘इतकी’ लाख घरे बांधली जाणार

Published by
Tejas B Shelar

Pm Awas Yojana News : स्वतःचे हक्काचे घर बनवणे ही सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी. सर्वसामान्य नागरिक घरासाठी आपल्या संपूर्ण आयुष्यातील जमापुंजी खर्च करतात. पण, संपूर्ण आयुष्यात कमावलेला पैसा लावूनही घराचे स्वप्न पूर्ण होईलच हे सांगता येत नाही. कारण म्हणजे वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत.

घरांच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. भविष्यातही घराच्या किमती अशाच विक्रमी पातळीवर कायम राहतील असे रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात.

यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक झगडत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न आता साकार करण्यासाठी सरकार एक नवीन योजना राबवणार आहे.

खरे तर ज्या लोकांना हक्काचे घर नाही त्या लोकांसाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. केंद्रातील सरकार तर योजना राबवतच आहे शिवाय महाराष्ट्रातील सरकार देखील अशा नागरिकांसाठी वेगवेगळ्या घरकुल योजना चालवत आहे.

राज्य सरकारकडून अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना, अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना, ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी नमो आवास योजना अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

तसेच केंद्रातील सरकारकडून पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा महाराष्ट्रातील नागरिकांना सुद्धा लाभ मिळतोय. या अंतर्गत अत्यल्प दरात घरांची निर्मिती करुन विक्री करण्यात येत असते. दरम्यान आता याच योजनेबाबत नवीन अपडेट हाती आली आहे.

या अंतर्गत महाराष्ट्रात तब्बल 10 लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली आहे. ते म्हटलेत की, नवीन गृहनिर्माण धोरण आता लागू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

महायुतीचे सरकार येताच त्याची अंमलबजावणी होणार आहे. 2007 पासून नवीन गृहनिर्माण धोरण बनले नव्हते. म्हणून आता नवीन सरकारचे पहिले प्राधान्य हे धोरण लागू करण्याला असेल. पत्रकारांसाठी सुद्धा सोलापुरात मोठी गृहनिर्माण योजना आकाराला येत आहे.

मुंबईतही योजनेचे भूमिपूजन झाले आहे. विविध आवास योजनांमध्ये 18 लाख 78 हजार परडवणारी घरे बांधण्यात आली आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील 14 लाख 70 हजार घरांचा यामध्ये समावेश आहे.

पंतप्रधान आवस योजनेतील आणखी 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. ओबीसींसाठी तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्याची 12 हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे काम सुरू आहे, असंही अतुल सावे यांनी म्हटले आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com