स्पेशल

पीएम किसानचा अठरावा हप्ता मिळाला नसेल तर ताबडतोब तक्रार नोंदवा, नाहीतर पैसे विसरा, कुठं करणार तक्रार ? वाचा…

Published by
Tejas B Shelar

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना नुकतीच एक मोठी भेट मिळाली आहे. 5 ऑक्टोबर रोजी पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचे बटण दाबून या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.

पीएम किसान सम्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता पाच ऑक्टोबरला वाशिम येथील पोहरादेवी येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे.

या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. हे पैसे 2 हजाराचा एक हफ्ता अशा पद्धतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण 18 हफ्ते मिळाले आहेत. 18 वा हफ्ता हा नुकताच मिळाला असून त्या अंतर्गत 9.4 कोटीहुन अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.

पण, जर तुमच्या खात्यात 18 वा हप्ता जमा झाला नसेल तर काय करणार? याच बाबत आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुमच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा झाले नसतील तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते चेक करायचे आहे.

pmkisan.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला ही लाभार्थ्यांची यादी पाहता येईल. लाभार्थी यादी चेक करण्यासाठी वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला “Farmers Corner” वर “Beneficiary Status” या बॉक्सवर क्लिक करायचे आहे.

याठिकाणी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. मग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Get Data वर क्लिक करून तुम्ही लाभार्थी यादी चेक करू शकता. जर यात तुमचे नाव दिसत नसेल तर तुम्हाला अठरावा हफ्ता मिळालेला नसेल.

अशावेळी तुम्ही शेतकरी हेल्पलाईन क्रमांक – 155261 वा टोल फ्री क्रमांक- 1800115526 वर कॉल करू शकतात. 011-23381092 या क्रमांकावर सुद्धा तुम्हाला मदत मागता येणार आहे. शेतकरी pmkisan-ict@gov.in च्या माध्यमातूनही तक्रार नोंदवू शकतात.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar