Pm Kisan Yojana New Update : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत तर दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण सरकारकडून सुरू आहे.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते देण्यात आले असून पुढील 19 व्या हप्त्या संदर्भात देखील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरे तर 2024 हे वर्ष आता संपण्यात आहे. लवकरच 2025 सुरू होणार आहे.
दरम्यान या 2024 मध्ये पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण तीन हप्ते देण्यात आले आहेत. सोळावा, सतरावा आणि अठरावा हप्ता या वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण 2024 मध्ये 16 वा, सतरावा आणि अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा झाला होता आणि आगामी 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत वर्ग होऊ शकतो याबाबत सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
16 वा अन 17वा हफ्ता कधी मिळाला?
सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. हा हप्ता सुद्धा महाराष्ट्रातूनच पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. सतरावा हप्ता 18 जून 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. हा हप्ता उत्तर प्रदेश येथील वाराणसी अर्थातच काशी येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला.
अठरावा हप्ता कधी मिळाला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील वाशिम जिल्ह्यात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात सहभागी होत पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. 5 ऑक्टोबर 2024 ला हा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळाला.
19 वा हप्ता कधीपर्यंत मिळणार?
पी एम किसान योजनेचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला असता प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यानुसार पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल अशी बातमी समोर येत आहे. मात्र हा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार
आणि फेब्रुवारी मध्येच हा हप्ता जमा होईल का या संदर्भात अधिकृत माहिती हाती आलेली नाही. परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांना मिळतो यानुसार फेब्रुवारी 2025 मध्ये पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.