Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली असून या अंतर्गत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. पण हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकरकमी म्हणजे एकाचवेळी मिळत नाहीत.
दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते, अर्थातच एका आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांचे एकूण तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या 19 व्या हप्त्याची चर्चा सुरू आहे.
अठरावा हप्ता जमा होऊन आता जवळपास साडेतीन महिन्याहुन अधिकचा काळ पूर्ण झाला आहे अन म्हणून याचा पुढील 19 वा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होणार हा मोठा सवाल होता, म्हणून साहजिकचं शेतकरी बांधव याच्या पुढील हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पण, आता पुढील 19 व्या हप्त्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे, देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीएम किसानचा पुढील हप्ता कधी खात्यात येणार याबाबत मोठी माहिती दिली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 19 वा हफ्त्याबाबत काय अपडेट दिली आहे, 19वा हफ्ता कधी मिळणार, यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार? याबाबत सविस्तर आढावा घेणार आहोत.
केव्हा मिळणार पीएम किसान चा 19 वा हप्ता?
मंडळी, पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा अठरावा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील वाशिम येथून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 वा हप्ता जमा करण्यात आला होता. दरम्यान आता या योजनेचा पुढील 19 वा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधून १९ व्या हप्त्याचं वितरण करणार आहेत.
चौहान बिहारमधील पटणा येथे कर्पूरी ठाकूर यांच्या १०१ व्या जयंती निमित शुक्रवारी प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पण, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी.
तसेच पीएम किसानचं स्टेट्स तपासण्यासाठी योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in वेबसाईटवर जाऊन होमपेजवरील फार्मर कॉर्नरवर क्लिक करावे अन त्यानंतर स्टेटस जाणून घ्या वर क्लिक करा. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा टाका.
गेट ओटीपीवर क्लिक करून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका. त्यानंतर तुम्हाला पीएम किसानच्या हप्त्याचा मागील तपशील पाहता येईल. मंडळी, पीएम किसानचा पुढील 19वा हप्ता हा अर्थसंकल्पानंतर येणार आहे.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला केंद्राचा अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यानंतरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येईल. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पीएम किसानची रक्कम वाढणार अशा चर्चा सुरू आहेत. पीएम किसानची रक्कम सहा हजारावरून दहा हजार रुपये केली जाणार असा दावा मेडिया रिपोर्ट मध्ये होतो.
महत्त्वाचे म्हणजे याबाबतचा निर्णय हा अर्थसंकल्पातच घेतला जाईल असे सुद्धा सांगितले जात आहे. यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेबाबत नेमका काय निर्णय होतो, या योजनेची रक्कम खरच वाढणार का? हे सुद्धा पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.