PM Kisan Yojana :- केंद्र सरकारने 2018 मध्ये शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत दरवर्षी 6,000 रुपयांची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्स्फर केली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते.
शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार रुपये जमा झाले –
केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत पीएम किसान सन्मान निधी म्हणून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 10 हप्ते जारी केले आहेत. या संदर्भात आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 20,000 रुपये ट्रान्स्फर करण्यात आले आहेत.
1 जानेवारी 2022 रोजी पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी करण्यात आला. 10वा हप्ता म्हणून, देशभरातील 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये ट्रान्स्फर करण्यात आले.
या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत –
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केलेली नाही आणि योजनेच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना 11 वा हप्ता म्हणून 4,000 रुपये मिळण्याची संधी आहे.
जर नवीन शेतकऱ्यांनी 31 मार्च 2022 पूर्वी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली, तर त्यांना 11 व्या हप्त्यासह एकूण 4,000 रुपये आणि 10 व्या हप्त्यासाठी 2,000 रुपये मिळू शकतात.
आता हे नियम योजनेच्या लाभासाठी अनिवार्य आहेत –
केंद्र सरकारने या योजनेशी संबंधित काही अटींमध्ये नुकतेच बदल केले आहेत. आता शेतकऱ्यांना त्यांच्या पीएम किसान खात्याचे ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
जर शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्याचे ई-केवायसी केले नाही, तर त्यांच्या खात्यात 11व्या हप्त्याची रक्कम दिली जाणार नाही.पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन शेतकरी त्यांचे खाते ई-केवायसी करू शकतात.