स्पेशल

अरे बापरे…! प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावावर शेतकऱ्यांची लुबाडणूक ; अनुदानाचे आमिष दाखवून जमवतायेत लाखोंचे ‘दान’

Published by
Ajay Patil

Pm Kusum Yojana : शासनाकडून शेतकऱ्यांच्या तसेच सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच कल्याणकारी योजना राबवल्या जात असतात. प्रधानमंत्री कुसुम योजना ही देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार पंप बसवण्यासाठी अनुदान दिला जातो.

ही योजना केंद्राची एक महत्त्वाकांशी योजना असली तरी देखील ही योजना प्रत्यक्षात आपल्या राज्यात महावितरणकडून म्हणजे राज्य शासनाकडून राबवली जाते. या योजनेसाठी शेतकऱ्यांना निश्चितच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले जाते.

मात्र सध्या बनावट मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबसाईट तयार करून पीएम कुसुम योजनेच्या नावावर फसवणूक होत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येऊ लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सजग राहण्याचे आवाहन केले जात आहे.

ही शेतकऱ्यांना लुबाडणारी टोळी इतकी शातिर आहे की त्यांनी यासाठी रीतसर अशी वेबसाईट तयार केली आहे त्यावर नोंदी ठेवल्या आहेत. हे तर काहीच नाही तर या टोळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा झाल्याचा बनावट मेसेज देखील पाठवला जातो.

हे सगळे पाहून होय भाबळे शेतकरी बांधव रजिस्ट्रेशन च्या नावावर या टोळीच्या घशात हजारो रुपये ओतत असल्याचे चित्र आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम कुसुम योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी किसान सौर ऊर्जा डॉट इन यांसारख्या बनावट वेबसाईट कार्यरत झाल्या आहेत.

या लिंक वर गेलेले शेतकरी अर्ज भरतात मग नोंदणीसाठी 5600 भरून घेतले जातात. विशेष म्हणजे शेतकरी बांधव तीन लाख रुपये मिळतील या आशेने या अशा वेबसाईटवर पैसे देखील भरतो.

फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हे काम करावे

या योजनेसाठी अर्ज भरणे हेतू किंवा कोणतीही माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकृत महाडिस्कॉम या वेबसाईटवर भेट द्यावी. या वेबसाईटवर शेतकऱ्यांना पीएम कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती मिळेल. या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आवाहन केले जात आहे.

या ठिकाणी शेतकरी बांधवांनी कोणत्याही सोशल मीडिया साइटवरून आलेल्या लिंकवर सर्रासपणे विश्वास ठेवू नये आणि त्या ठिकाणी अर्ज करू नये. तसेच फोनवर कोणतीही वैयक्तिक माहिती सार्वजनिक करू नये, कोणत्याही सबबीवर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे भरून नयेत असे शेतकऱ्यांना सांगितले गेले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil