Post Office FD Vs NSC Scheme : जर तुम्हीही पैशांची गुंतवणूक करू इच्छित असाल आणि यासाठी सुरक्षित गुंतवणुक योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास ठरणार आहे. खरे तर अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध झाल्या आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी देखील विविध ऑप्शन्स गुंतवणूकदारांपुढे आहेत.
पोस्ट ऑफिसची एफडी अन आरडी योजना, एलआयसी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजना, बँकेची एफडी योजना अशा विविध ठिकाणी गुंतवणूकदार गुंतवणूक करत आहेत.
दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेची आणि पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीमची तुलना करणार आहोत. या दोन्हीपैकी कोणती योजना गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर राहणार आहे याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
पोस्ट ऑफिस नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये गुंतवणूकदारांना चांगले व्याज दिले जात आहे. या स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.7% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.
जर समजा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या NSC मध्ये 2,00,000 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला त्यावर 5 वर्षांत 7.7 टक्के दराने 89,807 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण रु. 2,89,807 मिळतील. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर सवलत देखील मिळते.
पोस्ट ऑफिस एफडी स्कीम
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ज्याला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते. या योजनेत पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास पोस्ट ऑफिस कडून 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस FD मध्ये रु. 2,00,000 गुंतवल्यास, सध्याच्या 7.5 टक्के व्याजदरावर आधारित गणना दर्शवते की त्यावर तुम्हाला रु. 89,990 व्याज मिळतील.
अशा प्रकारे तुमची मॅच्युरिटी रक्कम रु. 2,89,990 होईल. विशेष बाब अशी की पोस्ट ऑफिसच्या या पाच वर्षांच्या एफ डी मध्ये गुंतवणूक केल्यास आयकर सवलतीचा देखील लाभ मिळतो.
कोणती योजना फायदेशीर
खरे तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 7.7% या रेटने व्याज दिले जात आहे. दुसरीकडे पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या FD मध्ये 7.5% दराने व्याज दिले जात आहे.
मात्र असे असले तरी पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेपेक्षा कमी परतावा मिळतं असल्याचे आपल्या लक्षात आले असेल.
याचे कारण म्हणजे पोस्ट ऑफिस FD मध्ये व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते आणि NSC मध्ये ती वार्षिक आधारावर मोजले जात आहे.