Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना राबवल्या जात आहेत. अशीच एक बचत योजना आहे टाईम डिपॉझिट स्कीम. टाईम डिपॉझिट योजनेचे स्वरूप बँकांच्या एफडी योजनेप्रमाणेच आहे. यामुळे सर्वसाधारणपणे या योजनेला पोस्ट ऑफिसची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते.
या योजनेत अनेकजण गुंतवणूक करत आहेत. दरम्यान जर तुम्हीही बँकेच्या एफडी योजनेत पैसे गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी पोस्टाची ही योजना फायदेशीर ठरणार आहे. पोस्ट ऑफिसकडून एक, दोन, तीन आणि पाच वर्षांची टाईम डिपॉझिट योजना ऑफर केली जात आहे.
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये किमान शंभर रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. अर्थातच 100 रुपयांच्या पुढे गुंतवणूकदार त्याला हवी तेवढी रक्कम या योजनेत गुंतवू शकतो.
या योजनेतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणे शक्य होणार आहे. दरम्यान आता आपण पोस्टाच्या याचं टाईम डिपॉझिट योजनेच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना?
पोस्ट ऑफिसच्या एक वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 6.9%, दोन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना सात टक्के, तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.10% आणि पाच वर्ष कालावधीच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.50% या रेटने व्याज दिले जात आहे.
पोस्टाच्या तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत 3 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?
पोस्ट ऑफिसच्या तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर त्याला मॅच्युरिटी वर म्हणजेच तीन वर्षाचा काळ पूर्ण झाल्यावर तीन लाख 70 हजार 523 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच सदर गुंतवणूकदाराला या तीन वर्षांच्या काळात 70,523 रुपयांचा नफा मिळणार आहे.
दुसरीकडे जर पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत तीन लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर मॅच्युरिटी वर सदर गुंतवणूकदाराला 4,57,623 रुपये मिळणार आहेत म्हणजेच एक लाख 57,623 रुपये सदर गुंतवणूकदाराला रिटर्न मिळणार आहेत.