स्पेशल

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदार बनणार मालामाल ! 4 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?

Published by
Tejas B Shelar

Post Office Scheme : भारतात आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जाते. अनेक जण आपल्याकडील पैसा आणखी वाढावा यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील फारच अधिक आहे. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतोय.

आज आपण पोस्ट ऑफिस च्या टाईम डिपॉझिट योजनेबाबत माहिती पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस ची टाइम डिपॉझिट योजना ज्या योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते.

कशी आहे पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना?

पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना ही बँकेच्या एफडी योजनेप्रमाणेच आहे. या योजनेला टीडी योजना म्हणूनही ओळखले जाते. पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना ही एक, दोन, तीन आणि पाच वर्षांची असते. पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कालावधीनुसार व्याज दिले जाते.

पोस्ट ऑफिस ने दिलेल्या माहितीनुसार, पोस्टाच्या एक वर्षांच्या टीडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9% दराने परतावा दिला जातो. तसेच दोन वर्षाच्या टीडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात टक्के व्याजदराने परतावा दिला जातो.

तसेच तीन वर्षाच्या टीडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% व्याजदराने परतावा दिला जातो. शिवाय पाच वर्ष कालावधीच्या टाईम डिपॉझिट गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% व्याजदराने परतावा दिला जातो.

दरम्यान आता आपण पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या टीडी योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने चार लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटी वर किती पैसे मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

4 लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?

पोस्टाच्या टीडी कॅल्क्युलेटरनुसार, जर 5 वर्ष कालावधीच्या टीडी योजनेत एखाद्या ग्राहकाने चार लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीवर म्हणजेच 60 महिने पूर्ण झाल्यानंतर 5 लाख 79,979 मिळणार आहेत म्हणजेच 1 लाख 79,979 रिटर्न म्हणून मिळणार आहेत.

जर याच कालावधीच्या TD योजनेत एखाद्याने सहा लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदारांना आठ लाख 69 हजार 969 रुपये रिटर्न म्हणून मिळणार आहेत म्हणजेच दोन लाख 69 हजार 969 रुपये व्याज म्हणून सदर गुंतवणूकदाराला मिळतील. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे जर गुंतवणूकदारांना हवे असेल तर ते समान कालावधीसाठी ही योजना एक्सटेंड करू शकतात.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar