Post Office Scheme : जर तुम्हीही नजिकच्या भविष्यात तुमच्याकडील पैसे कुठे सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस चा पर्याय बेस्ट ठरणार आहे. पोस्ट ऑफिस मध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते आणि यातून ग्राहकांना चांगला परतावा सुद्धा मिळतो.
अशा परिस्थितीत आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून ग्राहकांना फक्त व्याज म्हणून 20 लाख रुपये मिळू शकणार आहेत. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना ही गोष्ट शक्य करून दाखवते.

पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेला टीडी योजना किंवा एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते. या योजनेचे स्वरूप बॅंकांच्या एफडी योजनांप्रमाणेच असल्याने या योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखतात.
दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेतून कशा पद्धतीने वीस लाख रुपयांचे व्याज मिळणार याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे पोस्ट ऑफिस ची टाईम डिपॉझिट योजना?
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदारांना एका वर्षासाठी, दोन वर्षासाठी, तीन आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. एका वर्षाच्या टीडी योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 6.9% दराने, दोन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास सात टक्के दराने, तीन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7.10% दराने आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7.50% दराने परतावा मिळतो.
महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या टीडी योजनेला एक्सटेंड सुद्धा करता येते. म्हणजे जर तुम्ही पाच वर्षांच्या टीडी योजनेत गुंतवणूक केली तर तुमचा मॅच्युरिटीचा काळ पूर्ण होण्याच्या आधी तुम्ही ही योजना आणखी पाच वर्षांसाठी एक्सटेंड करू शकता.
कसे मिळणार 20 लाखांचे व्याज?
तुम्हाला पोस्टाच्या या योजनेतून वीस लाखांचे व्याज हवे असेल तर तुम्हाला पाच वर्षांच्या टीडी योजनेत दहा लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. पाच वर्षांच्या टीडी योजनेत एवढी रक्कम गुंतवल्यानंतर तुम्हाला या योजनेला दोनदा मुदतवाढ सुद्धा द्यावी लागणार आहे.
म्हणजेच तुम्हाला या योजनेत दहा लाख रुपये एकूण 15 वर्षांसाठी गुंतवयाचे आहेत. जर तुम्ही पाच वर्षांच्या टीडी योजनेत 10 लाख रुपये गुंतवले तर 7.5 टक्के व्याजदराने तुम्हाला या रकमेवर 4,49,948 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, एकूण रक्कम 14,49,948 रुपये होईल.
परंतु जर तुम्ही ही योजना 5 वर्षांसाठी आणखी वाढवली तर तुम्हाला फक्त 11,02,349 रुपये व्याज मिळतील आणि 10 वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम 21,02,349 रुपये होईल. मात्र तुम्हाला फक्त वीस लाख रुपयांची व्याज हवे असेल तर तुम्हाला ही रक्कम आणखी एकदा गुंतवावी लागणार आहे.
अशा परिस्थितीत 15 व्या वर्षी 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला फक्त 20,48,297 रुपये व्याज मिळेल. पंधराव्या वर्षी तुम्हाला एकूण 30 लाख 48 हजार 297 रुपये मिळतील यामध्ये 20 लाख 48,297 रुपये तुम्हाला व्याज म्हणून मिळणार आहेत.