गुंतवणूकदारांची होणार चांदी ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, महिन्याला मिळणार 11 हजार रुपये

Tejas B Shelar
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. बँकेची एफडी योजना, आरडी योजना आणि पोस्ट ऑफिसची एफडी योजना आरडी योजना, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, गोल्ड बॉण्ड, रियल इस्टेट, सोने-चांदी असे असंख्य ऑप्शन आहेत. गुंतवणूकदार आपल्या सोयीने विविध ठिकाणी गुंतवणूक करतात.

दरम्यान, जर तुम्हीही तुमच्याकडील पैसा कुठे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची राहणार आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला महिन्याला 11000 रुपयांपर्यंतचे रिटर्न मिळणार आहेत.

म्हणजेच या योजनेत जोपर्यंत गुंतवणूक केलेली असेल तोपर्यंत गुंतवणूकदाराला महिन्याला 11000 रुपये मिळणार आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेची माहिती.

कोणती आहे ती योजना ?

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची एमआयएस योजना. यात बँकेच्या एफडी योजनेप्रमाणेच एकदा गुंतवणूक करावी लागते. यामध्ये गुंतवलेल्या पैशांवर मग पोस्ट ऑफिसकडून दरमहा व्याज दिले जाते.

याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे गुंतवणूकदार किमान 1000 रुपये रुपयांपासून गुंतवणूक करू शकतो. यात कमाल नऊ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

पण, जर या योजनेत एखाद्याने जॉईंट खाते ओपन केले असेल तर त्याला पंधरा लाख रुपयांची कमाल रक्कम गुंतवता येऊ शकते. सध्या येथे गुंतवणूक केलेल्या रकमेवर 7.4% एवढे व्याज दिले जाते.

या योजनेचा मॅच्युरिटी पिरीयड म्हणजेच परिपक्व कालावधी हा पाच वर्षे एवढा आहे.पाच वर्षानंतर तुम्ही पुन्हा नवीन खाते ओपन करून या योजनेत गुंतवणूक पुढे सुरु ठेवू शकता. पण तेच खाते तुम्हाला पुढे एक्सटेंड करता येत नाही.

अर्थातच एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला पाच वर्षांपर्यंत या योजनेतून एक निश्चित परतावा मिळत राहणार आहे. हेच कारण आहे की या योजनेला मासिक उत्पन्न योजना म्हणून ओळखले जाते. यातून दरमहा परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये ही योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. 

कसे मिळणार महिन्याला 11 हजार रुपये ? 

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एमआयएस योजनेतून प्रत्येक महिन्याला 11000 रुपये कसे मिळणार ? आम्ही आपणास सांगू इच्छितो की यातून दरमहा 11 हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला 18 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. मात्र या योजनेत जर जॉईंट खाते ओपन केले तर फक्त 15 लाख रुपये जमा करता येतात.

अशा परिस्थितीत 18 लाख रुपये जर तुम्हाला जमा करायचे असतील तर यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दोन खाती ओपन करू शकता आणि यात प्रत्येकी नऊ लाख रुपयांची रक्कम जमा करू शकता. अशा तऱ्हेने तुम्हाला या योजनेतून दर महिन्याला 11,100 रुपयांचे मासिक उत्पन्न मिळत राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe