पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! 5 लाख रुपये इन्वेस्ट करा अन फक्त व्याजातूनच 2 लाखाची कमाई करा, कोणती आहे ती स्कीम वाचा…..

Tejas B Shelar
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हालाही तुमच्याकडील पैसा वाढवायचा आहे का? यासाठी तुम्ही नजीकच्या भविष्यात गुंतवणुकीच्या तयारीत आहात का? अहो मग आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. खरे तर भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पण, बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिसची एफडी योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना, एलआयसीच्या बचत योजना यांसारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूप अधिक आहे.

आजही अधिकच्या परताव्यापेक्षा सुरक्षित गुंतवणुकीला आपल्या देशात अधिक महत्त्व आहे. कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये यासाठी आजही सुरक्षित गुंतवणुकीलाच प्राधान्य दिले जाते. अलीकडील काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या रिस्की ठिकाणी देखील गुंतवणूक वाढली आहे यात शंकाच नाही.

मात्र असे असले तरी बहुदा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. दरम्यान आज आपण अशाच एका सुरक्षित गुंतवणुकीच्या बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेची माहिती पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना चालवत आहे.

यामध्ये पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम या बचत योजनेचा देखील समावेश होतो. या योजनेला पोस्ट ऑफिसची एफडी योजना म्हणून ओळखतात. ही योजना बँकेच्या एफडी योजनेप्रमाणेच काम करत असल्याने याला पोस्ट ऑफिसची एफडी म्हणूनच ओळख मिळालेली आहे.

दरम्यान आज आपण या पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेचे स्वरूप आणि यातून पाच लाख रुपये गुंतवले तर दोन लाख रुपये व्याजाच्या स्वरूपात कसे मिळणार याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मधून किती व्याज मिळते?

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 7.5% पर्यंतचे व्याज मिळते. हे नवीन रेट गेल्या वर्षी लागू झाले आहेत. आधी पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सात टक्के दराने रिटर्न दिले जात होते. मात्र एप्रिल 2023 पासून पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.5% या रेटने परतावा दिला जात आहे.

पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेचे स्वरूप कसे आहे

गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात. या अंतर्गत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करता येतात. जर तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

जर तुम्ही 2 किंवा 3 वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला 7 टक्के दराने व्याज मिळेल आणि जर तुम्ही 5 वर्षांसाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.5 टक्के व्याज मिळेल.

पाच लाखाच्या गुंतवणूकीवर मिळणार दोन लाखाचे व्याज

पोस्ट ऑफिसच्या या टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये अर्थातच FD योजनेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे. जर तुम्हीही या एफडी योजनेत गुंतवणुकीच्या तयारीत असाल तर तुम्हाला या योजनेतून चांगले रिटर्न मिळणार आहेत.

जर तुम्ही या योजनेत पाच वर्षाच्या काळासाठी पाच लाख रुपये गुंतवले तर 7.5% या इंटरेस्ट रेटने तुम्हाला पाच वर्षानंतर अर्थातच मॅच्युरिटीवर सात लाख 24 हजार 974 रुपयांची रक्कम मिळणार आहे म्हणजेच पाच वर्षात तुम्हाला दोन लाख 24 हजार 974 रुपये एवढे रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe