पोस्टाची भन्नाट योजना ! दरमहा 5 हजार रुपये गुंतवा अन 8 लाख रुपये मिळवा, वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published:

Post Office Scheme : समाजात पैशाला फारच मान आहे. मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी देखील पैशांची गरज भासते. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन प्रमुख आणि मूलभूत गरजा याच पूर्ण करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो.

म्हणूनच प्रत्येकजण आपल्या कमाईतून काहीतरी वाचवित आहे अन अशा ठिकाणी गुंतवणूक करू इच्छित आहे, जेथे त्याचे पैसे सुरक्षित आहेत आणि त्याला चांगला परतावा सुडा मिळतो. अनेकजण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतात. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीम अलीकडे फारच लोकप्रिय झालेल्या आहेत.

या ठिकाणी केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव म्हणजे पोस्ट ऑफिस आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. पोस्ट ऑफिसची आरडी योजना अशी योजना आहे ज्यामध्ये आपण दरमहा फक्त 5000 रुपयांची गुंतवणूक करून 8 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता.

विशेष गोष्ट अशी आहे की, या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना सहजतेने कर्ज सुद्धा मिळते. अशा परिस्थितीत, आता आपण या योजनेचे संपूर्ण स्वरूप आणि यावर किती कर्ज मिळते याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

पोस्टाच्या आरडी योजनेचे स्वरूप कसे आहे ?
पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये एकाच वेळी पैसे गुंतवण्याची गरज नसते तुम्ही यामध्ये दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून मोठा फंड तयार करू शकता. पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.7% दराने व्याज दिली जात आहे.

गेल्या वर्षी 2023 मध्ये सरकारने पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेवर व्याज दर वाढवून गुंतवणूकदारांना भेट दिली होती. या योजनेतील गुंतवणूकीवर 6.7 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांचे व्याज दर दर तीन महिन्यांनी सुधारित केले जात आहेत. दरम्यान आता आपण या योजनेत दरमहा पाच हजार रुपये गुंतवून कशा पद्धतीने आठ लाख रुपये मिळणार? याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.

कसे मिळणार 8 लाख ?
जर समजा तुम्ही यात दरमहा पाच हजार रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी म्हणजेच 60 महिने कालावधीनंतर तुम्ही यामध्ये तब्बल तीन लाख रुपये गुंतवणार आहात. या तीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 56,830 व्याज म्हणून मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला पाच वर्षांच्या कालावधीत तीन लाख 56 हजार 830 रुपये मिळतील.

पण जर तुम्ही ही योजना पुन्हा पाच वर्षांसाठी एक्सटेंड केली म्हणजेच पोस्टाच्या या आरडी योजनेत आणखी पाच वर्षांसाठी दरमहा पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर दहा वर्षांनी तुमची गुंतवणूक सहा लाख रुपये एवढी होणार आहे आणि तुम्हाला यावर 6.7% दराने 2 लाख 54 हजार 272 एवढे व्याज मिळणार आहे.

म्हणजेच दहा वर्षांच्या काळात तुम्हाला पोस्टाच्या आरडी योजनेमधून दरमहा पाच हजार रुपये गुंतवून 8 लाख 54 हजार 272 रुपये मिळणार आहेत यामध्ये तुमची गुंतवणूक सहा लाख रुपयांची राहील आणि उर्वरित दोन लाख 54 हजार 272 रुपये तुमचे व्याज राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe