Post Office Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. काही लोक शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांसारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. दुसरीकडे अनेकजण अजूनही सोन्यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.
याशिवाय बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस एफडी योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना, पोस्ट ऑफिसची बचत योजना, एलआयसीची बचत योजना यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेकजण पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत किंवा पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करत आहेत.
खरेतर पोस्टाच्या एफडी योजनेत म्हणजेच टाईम डिपॉझिट योजनेत 5 वर्षांच्या कालावधीसाठी पैसा गुंतवला तर गुंतवणूकदारांना 7.5% या इंटरेस्ट रेटने परतावा दिला जातो. येथील गुंतवणूक ही सुरक्षित असल्याने अनेकजण या ठिकाणी गुंतवणूक करतात.
पण पोस्टाने महिलांसाठी अशी एक योजना सुरू केली आहे ज्यामध्ये टाईम डिपॉझिट योजनेच्या पाच वर्षे कालावधीच्या गुंतवणुकीसाठी जेवढा व्याजदर दिला जात आहे तेवढाच व्याजदर दोन वर्षाच्या कालावधीसाठी दिला जातोय.
आम्ही बोलतोय पोस्टाने सुरू केलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेविषयी. पोस्टाने सुरू केलेल्या या योजनेत महिलांना दोन वर्ष कालावधीसाठी पैसे गुंतवता येतात आणि त्यांना या गुंतवलेल्या पैशांवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते.
म्हणजेच महिलांना फक्त दोन वर्षांच्या या योजनेवर 5 वर्षांच्या एफडीवर जेवढे व्याज मिळत आहे तेवढेच व्याज मिळणार आहे. म्हणजे एफडी मध्ये पाच वर्षे पैसे गुंतवण्यापेक्षा या योजनेत गुंतवणूक करून तेवढाच व्याजदर मिळवता येणे शक्य होणार आहे.
या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कोणतीही महिला या योजनेत गुंतवणूक करू शकते. अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी त्यांचे पालक हे खाते खोलू शकतात.
या योजनेत महिलांना 7.5 टक्के दराने चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो आणि व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते. म्हणजे या योजनेच्या माध्यमातून महिलांना जमा केलेल्या रकमेवर चांगला नफा मिळतो.
या योजनेची आणखी एक मोठी विशेषता अशी की या योजनेचा परिपक्वता कालावधी जरी दोन वर्ष असला तरी देखील एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिलांना 40% पर्यंतची रक्कम काढता येऊ शकते. म्हणजे पैशांची मध्येच अडचण भासली तर यातून पैसे काढता येऊ शकतात.