स्पेशल

आता कशाला बँकेत एफडी? पोस्टाची एफडी योजना आहे खूपच भारी! 2 लाखाची एफडी केली तर किती वर्षात किती मिळेल व्याज?

Published by
Ajay Patil

Post Office FD Scheme:- आकर्षक मुदत ठेव योजना देशातील जवळपास सर्वच बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येतात. निश्चित परताव्याची हमी आणि गुंतवणुकीची सुरक्षितता या दृष्टिकोनातून मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट योजनांना गुंतवणूकदारांकडून प्रथम प्राधान्य देण्यात येते.

या व्यतिरिक्त जर आपण बघितले तर ज्याप्रमाणे बँकांच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी योजना राबवल्या जातात. अगदी याच पद्धतीने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील फिक्स डिपॉझिट म्हणजे एफडी योजना राबवली जाते.

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना देखील एक सरकारी योजना असून यामध्ये गुंतवलेली रक्कम ही पूर्णपणे सुरक्षित राहते.त्यामुळे तुम्हाला देखील एफडी करून चांगला परतावा मिळवायचा असेल आणि गुंतवणूक सुरक्षित ठेवायची असेल तर पोस्ट ऑफिसची फिक्स डिपॉझिट योजना तुमच्यासाठी खूप फायद्याचा पर्याय ठरू शकतो.

काय आहेत पोस्ट ऑफिस एफडी योजनेचे वैशिष्ट्ये?

1- पोस्टाची एफडी योजना ही एक प्रकारची सरकारी योजना असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या योजनेत पैसे गुंतवणे हे खूप फायद्याचे ठरते.

2- या योजनेमध्ये तुम्ही एक वर्ष, दोन वर्ष तसेच तीन व पाच वर्ष कालावधी करिता एफडी करू शकतात. म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याच्या आर्थिक बजेटनुसार पैसे गुंतवण्याची मुभा मिळते व व्याजाच्या माध्यमातून पैसे कमवता येतात.

3- सध्या पोस्टाच्या एफडी योजनेत 5.5 टक्क्यांपासून ते सात टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याजदर मिळत असून तुम्ही जर पाच वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर तुम्हाला करात सवलत देखील मिळते.

4- या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुक ही जोखीममुक्त व जास्त प्रमाणात सुरक्षित आहे. तसेच या योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.

5- पोस्टाच्या एफडीमध्ये जर तुम्हाला खाते उघडायचे असेल तर एक हजार रुपयाची रक्कम गुंतवून तुम्ही खाते उघडू शकतात. तसेच जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला एफडी प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट देखील मिळते.

दोन लाखाच्या एफडीवर किती वर्षात किती मिळेल व्याज?

1- एक वर्षाची एफडी केली तर- समजा तुम्ही एक वर्षाकरिता दोन लाख रुपयांची एफडी केली तर तुम्हाला 6.9% व्याजदराने तेरा हजार 800 रुपये इतके व्याज मिळेल व एकूण मुदत संपल्यानंतर दोन लाख 13 हजार 800 रुपये मिळतील.

2- दोन वर्षाची एफडी केली तर- समजा तुम्ही या योजनेत दोन वर्षांसाठी दोन लाखांची एफडी केली तर तुम्हाला सात टक्के इतका वार्षिक व्याजदर मिळेल व दोन वर्षानंतर दोन लाखावर 29,400 इतके व्याज मिळेल व मुद्दल आणि व्याज असं दोन्ही मिळून तुम्हाला दोन वर्षात दोन लाख 29 हजार 400 रुपये मिळतील.

3- तीन वर्षांकरिता दोन लाखाची एफडी केली तर- समजा तुम्ही तीन वर्षाच्या कालावधी करिता दोन लाख रुपयांची एफडी केली तर सात टक्के व्याजदर तुम्हाला मिळेल व 45 हजार 900 रुपये तुम्हाला व्याज मिळेल. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुद्दल आणि व्याज मिळून दोन लाख 45 हजार 900 रुपये मिळतील.

4- पाच वर्षाकरिता एफडी केली तर- तुम्ही जर पाच वर्षाच्या कालावधी करिता दोन लाख रुपयांची एफडी केली तर तुम्हाला 7.5 टक्के इतका व्याजदर मिळेल व 86 हजार शंभर रुपये इतके व्याज मिळेल. असे मिळून पाच वर्षानंतर तुम्हाला दोन लाख 86 हजार 100 रुपये परत मिळतील.

Ajay Patil