Poultry Farming :- शेतीसोबत जोडधंदे हे पूर्वापार भारतातील शेतकरी करत आलेले आहेत. यामध्ये पशुपालन, शेळीपालन आणि मेंढीपालन मोठ्या प्रमाणावर केले जायचे व आज देखील केले जाते. या जोडधंद्यांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून हे जोडधंदे केले जातात.
या जोडधंद्यांसोबतच कुक्कुटपालन व्यवसायाचा जर आपण विचार केला तर अगोदर परसातील कुक्कुटपालन म्हणजेच अगदी आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय केला जायचा व यामध्ये प्रामुख्याने गावरान जातीच्या म्हणजेच देशी जातींच्या कोंबड्यांचे पालन केले जायचे.
परंतु आता कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री व्यवसायला देखील सुगीचे दिवस आले असून व्यवस्थित दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचा कुक्कुटपालन व्यवसाय करतात. यामध्ये ब्रॉयलर आणि लेयर कोंबडी पालन खूप मोठ्या प्रमाणावर केले जाते. परंतु त्यातल्या त्यात आता गावरान म्हणजेच देशी कोंबड्यांच्या देखील अनेक संकरित जाती विकसित करण्यात आलेल्या असून
कुक्कुटपालनाकरिता या जाती शेतकरी बंधूंना खूप फायद्याच्या ठरतात. आपल्याला कुक्कुटपालन करताना फक्त लक्षात हे घ्यायचे असते की तुम्हाला मांस उत्पादनासाठी कोंबडी पालन व्यवसाय करायचा आहे की अंडी पालनासाठी. हे निश्चित केल्यानंतर तुम्ही त्यानुरूप जातींची निवड कुक्कुटपालनाकरिता करू शकतात.
याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये काही संकरित जातींची माहिती घेणार आहोत जी कुक्कुटपालनाकरिता म्हणजेच मांस व अंडी उत्पादनाकरिता खूप फायदेशीर ठरतात.
कुक्कुटपालनात फायदेशीर कोंबड्यांच्या जाती
1- कृषि ब्रो- कोंबड्यांची ही संकरित जात कुक्कुट संशोधन संचालनालय, हैदराबाद या संस्थेने विकसित केलेले असून कुकुट पालना करीता ही खूप फायदेशीर अशी जात आहे. यामध्ये आकर्षक रंगाची पिसे व उष्ण तापमान जुळवून घेण्याची क्षमता असल्यामुळे कुठल्याही वातावरणामध्ये ही चांगले उत्पादन देऊ शकते. खास करून कृषी ब्रो ही जात मांस उत्पादनासाठी पाळणे फायदेशीर ठरते. जर आपण या जातीच्या वाढीचा किंवा वजनाचा विचार केला तर सहा आठवड्यामध्येही एक ते दीड किलो पर्यंत होते.
2- ग्रामप्रिया- कोंबड्यांची ही संकरित जात देखील कुक्कुट संशोधन संचालनालय हैदराबाद यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली असून ही अंडी उत्पादनासाठी उपयुक्त जात आहे. म्हणजेच तुम्हाला अंडी उत्पादनाकरिता जर कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल तर ग्रामप्रिया ही जात फायद्याचे ठरेल. ग्रामप्रिया ही जात व्हाईट लेग हॉर्न आणि स्थानिक जातींचा संकर करून विकसित करण्यात आली आहे. या जातीची अंडी उत्पादन क्षमता पाहिली तर जवळपास 72 आठवड्यांमध्ये दोनशे ते सव्वा दोनशे अंडी देते.
3- वनराजा- ही जात देखील कुक्कुट संशोधन संचालनालय हैदराबाद यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली जात आहे. अंडी आणि मांसउत्पादन या दोन्ही करता तुम्ही वनराजा या जातीचे पालन करू शकतात. वजन आणि हलकी आणि लांब पाय असल्यामुळे ही स्वतःची संरक्षण करण्यासाठी समर्थ अशी जात आहे. वनराजा ही जात स्थानिक जाती व कॉर्निश या जातींचा संकर आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये परसबागेतील कुक्कुटपालन करीता ही जात उपयुक्त आहे. वनराजा जातीचे जर अंडी उत्पादनक्षमता पाहिली तर एका वर्षामध्ये ही जात 160 ते 180 अंडी देऊ शकते.
4- श्वेतप्रिया-
ही देखील एक कुक्कुटपालनाकरिता फायदेशीर संकरित जात असून तिला पी.बी. 1 आणि नेकेड नेक या दोन जातींपासून संकर करून कुक्कुट संशोधन संचालनालय हैदराबाद यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली आहे. श्वेतप्रिया ही जात अंडी उत्पादनासाठी खूप महत्त्वपूर्ण असून तिची वार्षिक अंडी उत्पादनाची क्षमता दोनशे अंडी इतकी आहे.